Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्यांदाच अर्जुनच्या कुटुंबियांसोबत दिसली मलायका अरोरा, समजायचे का हे लग्नाचे संकेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 16:49 IST

मलायका अरोरा नुकतीच अर्जुन कपूरसोबत त्याचा चित्रपट 'इंडियाज मोस्ट वाँटेड'च्या स्क्रीनिंगला गेली होती.

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर गेल्या काही दिवसांपासून मलायका अरोरासोबतच्या अफेयरमुळे चर्चेत असतो. ते दोघे एकमेकांना बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहेत. नुकतीच मलायका अर्जुन कपूरसोबत त्याचा चित्रपट 'इंडियाज मोस्ट वाँटेड'च्या स्क्रीनिंगला गेली होती. यावेळी पहिल्यांदाच दोघांनी मीडियासमोर एकत्र पोझ दिली. इतकेच नाही तर यावेळी मलायकासोबत अर्जुनच्या कुटुंबातील सदस्य सहभागी होते.  

अर्जुन कपूर व मलायका अरोराने आतापर्यंत त्यांच्या रिलेशनशीपबद्दल खुलेपणाने बोलले नाहीत. त्यांचे फोटो व व्हिडिओ पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. मलायका अर्जुनसोबत फिल्म स्क्रिनिंगसाठी दुसऱ्यांदा गेली होती.

यादरम्यान मलायका पांढऱ्या रंगाच्या डीप नेक बॅकलेस टँक टॉप व निळ्या रंगाच्या जेनिममध्ये पहायला मिळाली. या लूकमध्ये ती खूप ग्लॅमरस दिसत होती. तर अर्जुन कपूर ब्लॅक टीशर्ट आणि निळ्या रंगाची डेनिम जिन्समध्ये दिसणार आहे.

इंडियाज मोस्ट वाँटेड चित्रपटाच्या स्क्रीनिंगनेळी फोटोग्राफर्सने अर्जुन व मलायका यांना एकत्र फोटो काढण्यासाठी सांगितले त्यावेळी त्यांनी कपल पोझ दिली. यावेळी अर्जुनने मलायकाच्या कंबरेवर हात ठेवून फोटो काढला. यावेळी ते दोघे खूप छान वाटत होते. त्यांच्या या फोटोवर कमेंट होत आहे. 

अर्जुन कपूर व मलायका अरोरा यांच्या लग्नाची चर्चा बऱ्याच कालावधीपासून सुरू आहे. मात्र त्या दोघांनी हे वृत्त अफवा असल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी अर्जुनने मलायका त्याच्यासाठी खास असल्याचे स्पष्ट केले होते.

टॅग्स :अर्जुन कपूरमलायका अरोरा