Join us

ठरले! या दिवशी मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर अडकणार लग्नबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 15:44 IST

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सार्वजनिक ठिकाणी एकमेकांसोबत वेळ घालवताना देखील दिसतात. पण त्या दोघांनीही त्यांच्या नात्यावर मौन राखणेच पसंत केले आहे. त्यांच्या लग्नाच्या चर्चांना देखील कित्येक दिवसांपासून ऊत आले आहे.

ठळक मुद्देमलायका आणि अर्जुन 19 एप्रिलला लग्न करणार असून त्या दोघांचे जवळचे मित्रमैत्रीण या लग्नाला उपस्थित राहाणार आहेत. पाहुण्यांच्या यादीत करिना कपूर खान, करिश्मा कपूर, दीपिका पादुकोण, रणवीर सिंग यांच्या नावाचा समावेश आहे.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यात प्रेमप्रकरण सुरू असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून मीडियात सुरू आहे. ते दोघे अनेक सार्वजनिक ठिकाणी एकमेकांसोबत वेळ घालवताना देखील दिसतात. पण त्या दोघांनीही त्यांच्या नात्यावर मौन राखणेच पसंत केले आहे. त्यांच्या लग्नाच्या चर्चांना देखील कित्येक दिवसांपासून ऊत आले आहे.

मलायका आणि अर्जुन लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. ते दोघे लग्न कधी करणार याविषयी स्पॉयबॉय वेबसाईटने एक्सक्ल्युझिव्ह बातमी दिली आहे. त्यांनी त्यांच्या बातमीत म्हटले आहे की, मलायका आणि अर्जुन 19 एप्रिलला लग्न करणार असून त्या दोघांचे जवळचे मित्रमैत्रीण या लग्नाला उपस्थित राहाणार आहेत. पाहुण्यांच्या यादीत करिना कपूर खान, करिश्मा कपूर, दीपिका पादुकोण, रणवीर सिंग यांच्या नावाचा समावेश आहे.

तसेच त्या दोघांनाही ही गोष्ट मीडियापर्यंत येऊ द्यायचे नाहीये असे ठरवले आहे आणि त्यामुळे त्यांचे हेअर स्टायलिस्ट, मेकअप आर्टिस्ट यांनी लग्नाच्या तयारीबद्दल कोणालाही सांगायचे नाही अशी ताकीद त्यांना देण्यात आली असल्याचे देखील या वृत्तात म्हटले आहे.

 अर्जुन आणि मलायका एप्रिलमध्ये लग्न करणार अशा बातम्या काही दिवसांपूर्वी देखील मीडियात आल्या होत्या. त्यावर मलायकाने या बातम्या मीडियाने बनवल्या आहेत असे म्हटले होते तर अर्जुनने योग्य वेळ येईल तेव्हा मी नक्कीच याबद्दल बोलेन असे म्हटले होते. 

काही दिवसांपूर्वीच करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये मलायकाने प्रेमाची अप्रत्यक्षपणे कबुली दिली होती. तर या आधी अर्जुन कपूरनेदेखील याच चॅट शोमध्ये अप्रत्यक्षपणे लग्नाचेही संकेत दिले होते. शोचा होस्ट करण जोहरने अर्जुनला त्याच्या रिलेशनशिप स्टेट्सविषयी प्रश्न विचारला असता मी सिंगल नाही, असे अर्जुन म्हणाला होता. अर्जुनच्या या उत्तराने त्याची बहीण जान्हवी कपूरलादेखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

अर्जुन कपूर आशुतोष गोवारीकरच्या पानीपतमध्ये लवकरच दिसणार आहे. या ऐतिहासिक सिनेमात अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत आहे. ‘पानीपत’ मध्ये अर्जुन कपूर सदाशिवराव भाऊ पेशवे यांची भूमिका साकारणार आहे.

टॅग्स :अर्जुन कपूरमलायका अरोरा