Join us
Daily Top 2Weekly Top 5

मलायका- अर्जुन 'या' ठिकाणी करणार डेस्टीनेशन वेडींग !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 15:26 IST

मलायकाने तिचे लग्न स्पेशल बनवण्यासाठी  तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. हे लग्न भारतीय रितीरिवाजानुसार करण्याचा निर्णय दोघांनी घेतला आहे.

लग्न घटिका समीप आली करा हो लगीनघाई म्हणत मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या लग्नासाठी काऊंटडाऊन सुरू झाल्याचे माहिती समोर येत आहे. मलायकाने तिचे लग्न स्पेशल बनवण्यासाठी  तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. हे लग्न ख्रिश्चन  रितीरिवाजानुसार करण्याचा निर्णय दोघांनी घेतला आहे. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर  19 एप्रिलला लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र अजुनतरी यांच्या लग्नाबद्दल अर्जुन किंवा मलायका यांच्याकडून कोणते ऑफिशिअल कन्फर्मेशन आलेले नाही. 

दिवसें दिवस या कपलच्या वेगवेगळ्या बातम्या येत असताना आणखी एक बातमी समोर येत आहे. लग्नासाठी हे कपल चांगल्या डेस्टीनेशच्या शोधात आहेत. त्यांनी  डेस्टीनेशन वेडींगसाठी आपली पहिली पसंती गोव्याला दिली आहे. चर्चेमध्ये हे लग्न होणार आहे.  आजपर्यंत दोघांनी त्यांचे नाते जगासमोर स्विकारले नसले तरीही त्यांचे अफेअर जगजाहीर आहे. त्यामुळे लग्नाचा जास्त गाजावाजा न करता  मोजकेच नातेवाइक आणि जवळच्या मित्र मंडळींच्या उपस्थितीत हे लग्न पार पडणार आहे. 

लग्नात सामील होण्यासाठी करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांच्याव्यतिरिक्त रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांना आमंत्रणही पाठवले गेले आहेत. या लग्नाची कोणत्याही प्रकारची माहिती बाहेर लिक होवू नये यासाठी पुरेपुर खबरदारी पाळण्यात आली आहे. तसेच  प्रियंका -निक जोनासप्रमाणे मलायका आणि अर्जुनदेखील लग्नमंडपात हटक्या पद्धतीने  एंट्री  करणार आहेत.

लग्नाधी हे दोघेही सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. सोशल मीडियावर मलायकाचे व्हॅकेशनवरचे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये मलायकाचे अंदाज खूपच बोल्ड आणि ग्मलॅरस पाहायला मिळतोय. मालदीव्हज व्हॅकेशनचे आतापर्यंत फक्त मलायकाचेच फोटो पाहायला मिळाले होते. मात्र तिथे तिच्यासोबत अर्जुन कपूरही होता. अर्जुननेही त्याच्या मालदीव्हज व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

काही दिवसांपूर्वीच करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये मलायकाने प्रेमाची अप्रत्यक्षपणे कबुली दिली होती. तर या आधी अर्जुन कपूरनेदेखील याच चॅट शोमध्ये अप्रत्यक्षपणे लग्नाचेही संकेत दिले होते. शोचा होस्ट करण जोहरने अर्जुनला त्याच्या रिलेशनशिप स्टेट्सविषयी प्रश्न विचारला असता मी सिंगल नाही, असे अर्जुन म्हणाला होता. अर्जुनच्या या उत्तराने त्याची बहीण जान्हवी कपूरलादेखील आश्चर्याचा धक्का बसला होता. 

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर