Join us
Daily Top 2Weekly Top 5

मलायका आणि अर्जुन कपूरच्या लग्नाचा मुहूर्त ठरला?, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 13:26 IST

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यात प्रेमप्रकरण सुरू असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून मीडियात सुरू आहे.

ठळक मुद्देएप्रिल महिन्यात दोघे ख्रिश्चन रितीरिवाजाप्रमाणे लागू करु शकतातअर्जुन कपूरनेदेखील याच चॅट शोमध्ये अप्रत्यक्षपणे लग्नाचेही संकेत दिलेत

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यात प्रेमप्रकरण सुरू असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून मीडियात सुरू आहे. ते दोघे अनेक सार्वजनिक ठिकाणी एकमेकांसोबत वेळ घालवताना देखील दिसतात. पण त्या दोघांनीही त्यांच्या नात्यावर मौन राखणेच पसंत केले आहे. लवकरच हे कपल लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांनी खंडवाला कॉम्प्लेक्समध्ये एक अलिशान फ्लॅट खरेदी केल्याची चर्चा आहे आणि सध्या इंटीरियचे काम सुरु आहे. लग्नानंतर मलायका व अर्जुन या फ्लॅटमध्ये शिफ्ट होतील, असे मानले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात दोघे ख्रिश्चन रितीरिवाजाप्रमाणे लागू करु शकतात. मात्र अजून काही कंन्फर्म नाही आहे.

काही दिवसांपूर्वीच करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये मलायकाने प्रेमाची अप्रत्यक्षपणे कबुली दिली होती. तर या आधी अर्जुन कपूरनेदेखील याच चॅट शोमध्ये अप्रत्यक्षपणे लग्नाचेही संकेत दिलेत. शोचा होस्ट करण जोहरने अर्जुनला त्याच्या रिलेशनशिप स्टेट्सविषयी प्रश्न विचारला. यावर मी सिंगल नाही, असे अर्जुन म्हणाला. अर्जुनच्या या खुलाशाने त्याची बहीण जान्हवी कपूर हिलादेखील आश्चयार्चा धक्का बसला. 

वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर, अर्जुन कपूर आशुतोष गोवारीकर पानीपतमध्ये लवकरच दिसणार आहे. या ऐतिहासिक सिनेमात अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत आहे.‘पानीपत’मध्येअर्जुन कपूर मराठा योद्धा सदाशिवराव भाऊ पेशवे याची भूमिका साकारणार आहे.

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर