Join us
Daily Top 2Weekly Top 5

मलायका अरोरा व अर्जुन कपूर एन्जॉय करताहेत हॉलिडे, अर्जुन म्हणतोय बेईमान है आज मौसम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 20:16 IST

मलायका अरोरा व अर्जुन कपूरच्या व्हॅकेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

मलायका अरोराअर्जुन कपूरच्या व्हॅकेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अर्जुन कपूरमलायका अरोरा या दोघांनी इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.

अर्जुनने इंस्टाग्राम स्टोरीवर व्हॅकेशनचे फोटो शेअर करत लिहिलं की, बेईमान है आज मौसम.

याशिवाय अर्जुनने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अर्जुन पोझ देताना दिसतो आहे. पीच हुडी व ब्लॅक सनग्लासेसमध्ये अर्जुन हॅण्डसम दिसतो आहे. या फोटोसोबत एक गोष्ट लक्ष वेधून घेत आहे. ती म्हणजे एका मुलीचा हात. फोटोंवर युजर्स कमेंट करत आहेत की अर्जुन कपूरची लेडी लव्ह मलायका अरोराचा हात आहे. अर्जुनच्या या फोटोला खूप पसंती मिळते आहे. 

काही दिवसांपूर्वी मलायका अरोराने तिचा एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोवर अर्जुन कपूरच्या काकांनी इन हाऊस फोटोग्राफर म्हणत टीज केलं होतं.

काही दिवसांपूर्वी मालदीव व्हॅकेशनचे फोटो शेअर करत मलायका अरोराने त्यांचे रिलेशन इंस्टावर ऑफिशिएल केलं होतं. दोघं नेहमी एकत्र पहायला मिळतात. त्या दोघांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना भावते आहे. 

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर अर्जुन कपूर सध्या पानीपतच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमासाठी अर्जुनने बाल्डदेखील केलं होतं. त्यामुळे त्याला गेल्या ९ महिन्यांपासून कॅप घालून फिरावं लागलं होतं. या चित्रपटात अर्जुन एक वॉरियरच्या रुपात पहायला मिळणार आहे.

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर