Join us

'या' मुलींना ओळखलं का? दोन्ही बहिणींनी गाजवलं बॉलिवूड, एक तर आहे फिटनेस क्वीन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 16:52 IST

या चिमुरड्या खऱ्या आयुष्यात सख्ख्या बहिणी आहेत.

आपले आवडते कलाकार लहानपणी कसे दिसत असतील याबाबत चाहत्यांनाही उत्सुकता असते. अनेक कलाकारांचे बालपणीचे फोटोही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच दोन अभिनेत्रींचा बालपणीचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. फोटोतील या दोघींनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हे फोटो पाहिल्यावर या दोघी नेमक्या कोण आहेत, असा अनेकांना प्रश्न पडला आहे. कारण, दोघींच्या बालपणीचा फोटो आणि त्यांचा आताचा लूक यांच्यात कमालीचा बदल झाला आहे. त्यामुळे अनेकांना त्यांना ओळखणं कठीण झालं आहे.

समोर आलेल्या फोटोत दिसणाऱ्या या चिमुरड्या खऱ्या आयुष्यात सख्ख्या बहिणी आहेत. बॉलिवूडमध्ये दोघीही सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत.  या दोघीपैकी एकीने चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर दुसरी आयटम साँगसाठी प्रसिद्ध आहे. फोटोत दिसणाऱ्या या चिमुकल्या दुसऱ्या तिसऱ्या कोणीही नसून मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अमृता अरोरा(Amrita Arora) या आहेत. 

नुकतंच मदर्स डे साजरा झाला. या खास दिवशी मलायकाने तिच्या आई आणि बहिणीसोबतचा एक जुना फोटो शेअर केला होता. या फोटोत दोघी बहिणी  बॉबकट हेअरस्टाईलमध्ये पाहायला मिळाल्या. तर याआधी अमृतानं  नॅशनल सिबलिंग डे मलायका आणि तिचे लहानपणीचे फोटो शेअर केले होते. मलायका आणि अमृता या दोघीही अनेकदा एकत्र दिसतात आणि त्यांच्यात एक खास बॉन्ड आहे. त्या एकत्र पार्टी, शॉपिंग आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसतात.

टॅग्स :मलायका अरोराअमृता अरोराबॉलिवूड