बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदीचा (Mandira bedi) पती आणि निर्माता-दिग्दर्शक राज कौशल (Raj Kaushal) यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. बुधवारी पहाटे राज यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अंत्यसंस्काराला बॉलिवूडचे अनेक दिग्गज हजर होते. अनेकांनी सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली. अभिनेत्री महिमा चौधरी (Mahima Chaudhry) ही सुद्धा राज यांना चांगलं ओळखत होती. मात्र राज यांच्या निधनावर प्रतिक्रिया देताना याच महिमाची एक गोष्ट चाहत्यांना खटकली. यावरून महिमा सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होतेय.
काल महिमा मुंबईत कुटुंबासोबत दिसली. यावेळी फोटोग्राफर्सनी तिला राज कौशल यांच्या अकाली निधनावर प्रतिक्रिया विचारली. यावर महिमा राज यांच्याबद्दल भरभरून बोलली. राज त्याच्या मोटर बाईकवर मला मुंबईत फिरवायचा. मी त्याला लहानपणापासून ओळखत होते, असे सांगत महिमाने राज यांचा तिच्या मोबाईलमध्ये असलेला बालपणीचा एक फोटोही दाखवला. महिमा हे सांगत असताना ती हसत असल्याचे काही चाहत्यांनी नोटीस केले आणि मग अनेकांनी महिमाला ट्रोल करायला सुरूवात केली.