Join us

वयाच्या ५२व्या वर्षी महिमा चौधरीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ? या अभिनेत्यासोबतचा व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 11:14 IST

Mahima Chaudhary : अभिनेत्री महिमा चौधरी सध्या सर्वत्र चर्चेत आहे आणि त्याचे कारण आहे तिचा एक नवीन व्हिडीओ.

अभिनेत्री महिमा चौधरी सध्या सर्वत्र चर्चेत आहे आणि त्याचे कारण आहे तिचा एक नवीन व्हिडीओ. नुकताच सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल झाला आहे, तो पाहिल्यानंतर चर्चा सुरू झाली आहे की, ५२ वर्षांच्या महिमा चौधरीने दुसरे लग्न केले आहे. याचे कारण म्हणजे, ती नववधूच्या वेशात ज्येष्ठ अभिनेते संजय मिश्रा यांच्यासोबत पोज देत होती. या व्हिडीओमध्ये आणखी एक जोडपेही दिसले. महिमा चौधरी आणि संजय मिश्रा एकमेकांशी खूप प्रेमाने बोलताना दिसत होते. या दोघांना अचानक लग्नाच्या पोशाखात पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

महिमा चौधरीने खरोखर दुसरे लग्न केलेले नाही, तर हा व्हिडीओ तिचा आणि संजय मिश्रा यांच्यासोबतच्या आगामी चित्रपट 'दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी'च्या प्रमोशनचा आहे. प्रमोशनच्या वेळी महिमा चौधरी नवरीच्या रूपात दिसली, तर संजय मिश्रा नवरदेवाच्या अवतारात दिसले. या चित्रपटाच्या प्रमोशनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हळूहळू समोर येत आहेत. पापाराझींसमोर संजय आणि महिमा एकत्र पोज देतानाही दिसले. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते त्यांच्या प्रमोशन करण्याच्या अनोख्या शैलीची कमेंट बॉक्समध्ये स्तुती करत आहेत.

'दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी'बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीने नुकताच तिच्या आगामी चित्रपट 'दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी'चा मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यात संजय मिश्रा आणि महिमा चौधरी यांचा लूक पाहायला मिळाला होता. त्याचबरोबर त्यांच्या भूमिकेचाही खुलासा झाला होता. पोस्टरमध्ये एका पन्नास वर्षांच्या व्यक्तीच्या दुसऱ्या लग्नाची जाहिरात छापलेली दिसते. यासोबतच अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले होते, 'वधू मिळाली आहे, आता तयार व्हा... कारण वरात लवकरच निघेल... तुमच्या जवळच्या किंवा थोड्या दूरच्या चित्रपटगृहांमधून.' या चित्रपटात व्योम आणि पलक ललवानी हे कलाकार देखील दिसणार आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mahima Chaudhary's Second Marriage at 52? Spotted with Actor Sanjay Mishra.

Web Summary : A video sparked rumors of Mahima Chaudhary's second marriage at 52, showing her as a bride with Sanjay Mishra. However, it's promotion for their upcoming film, 'Durlabh Prasad Ki Dusri Shadi'. The film's poster reveals a story of a middle-aged man's second marriage.
टॅग्स :महिमा चौधरी