‘आॅरफन ट्रेन’मध्ये माही गिल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2016 07:13 IST
अनुराग कश्यपच्या ‘देव डी’मधून ‘पारो’च्या भूमिकेतून नावाजलेली अभिनेत्री माही गिल लवकरच अवॉर्ड विजेती दिग्दर्शक त्रिशा रेच्या थ्रीलर‘आॅरफन ट्रेन’ चित्रपटात ...
‘आॅरफन ट्रेन’मध्ये माही गिल
अनुराग कश्यपच्या ‘देव डी’मधून ‘पारो’च्या भूमिकेतून नावाजलेली अभिनेत्री माही गिल लवकरच अवॉर्ड विजेती दिग्दर्शक त्रिशा रेच्या थ्रीलर‘आॅरफन ट्रेन’ चित्रपटात दिसणार आहे.माही सांगते की, ‘त्रिशासोबत काम करण्याचा अनुभव म्हणजे खूप शिकण्याची संधी होती. ती फार हुशार दिग्दर्शिका आहे. तिचा सेन्स आॅफ ह्युमर तर कमाल आहे. आतापर्यंत मी वाचलेल्या पटकथांपैकी आॅरफन ट्रेनची पटकथा सर्वोत्तम आहे. स्क्रीनप्ले लेखक ब्राएन स्ट्युअर्टला याचे सारे श्रेय जाते.’चित्रपटामध्ये माही पर्यावरण रक्षक हेलेन प्रॉस्टच्या भूमिकेत असून किरणोत्सर्गामुळे मृत्यू झालेल्या मुलांच्या केसचा ती शोध घेते. आॅरफन ट्रेन हा अमेरिकन इंडिपेंडन्ट सिनेमा आहे.