Join us

महेश मांजरेकर यांची ही लेक लंडनच्या रस्त्यावर दिसतेय फेरफटका मारताना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 13:08 IST

प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते महेश मांजरेकर यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते महेश मांजरेकर यांच्या प्रोफेशनल लाइफबद्दल सर्वांनाच माहित आहे. पण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. महेश मांजरेकर यांची पत्नी मेधा मांजरेकर यादेखील अभिनेत्री आहेत. तर या दोघांना सई, अश्वमी आणि सत्या या तीन मुलांव्यतिरिक्त आणखी एक लेक आहे. ती म्हणजे गौरी इंगवले. महेश मांजरेकर यांची एक लेक सध्या लंडनच्या रस्त्यावर फेरफटका मारताना दिसते आहे. कोण लंडनमध्ये आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. तर अभिनेत्री सई मांजरेकर सध्या लंडनमध्ये असून तिथले फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते आहे.

अभिनेत्री सई मांजरेकर हिने दबंग ३ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तसेच ती सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

गेल्या काही दिवसांपासून ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत आहे. तिचे हे फोटो पाहून ती कुठे आहे आणि सध्या काय करते आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

तर सई सध्या लंडनमध्ये आहे आणि तिथे फेरफटका मारतानाचे फोटो शेअर केले आहेत. सई मांजरेकर हिरोपंती २च्या शूटिंगसाठी लंडनमध्ये गेली असल्याचे सांगितले जात आहे.

हिरोपंती २मध्ये अभिनेता टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

सई मांजरेकर दबंग ३ नंतर आयुष शर्मासोबत ‘मांझा’ या गाण्यात पहायला मिळाली. या गाण्यातील आयुष आणि सईची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावली होती.

याशिवाय ती मेजर या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.  

टॅग्स :महेश मांजरेकर सई मांजरेकरटायगर श्रॉफ