Join us

"माझी आई मुस्लिम होती...", हिंदू आणि मुस्लिम धर्मावर महेश भट यांचं विधान चर्चेत, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 11:28 IST

हिंदू आणि मुस्लिम धर्मावर महेश भट यांनी भाष्य केलं.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. सशस्त्र कट्टरतावाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या गोळीबारात २६ लोकांचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यातून बचावलेल्या काही पर्यटकांनी माध्यमांसमोर सांगितलं की, चार दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि त्यांनी गोळीबार करण्यापूर्वी पर्यटकांचा धर्म विचारला. "तुम्ही हिंदू आहात का?" असा प्रश्न विचारून, जे हिंदू होते, त्यांच्यावरच गोळ्या झाडल्या गेल्याचं सांगितलं. या प्रकरणावर सध्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. हिंदू आणि मुस्लिम धर्मावर महेश भट यांनी भाष्य केलं.

अलिकडेच बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत महेश भट म्हणाले,  "माझा जन्म १९४८ मध्ये स्वतंत्र भारतात झाला होता. माझी आई शिया मुस्लिम होती आणि माझे वडील नागर ब्राह्मण  होते. शिवाजी पार्क हे मुंबईतील एक प्रसिद्ध उद्यान आहे, आमचं घर त्याच्या जवळच होतं. माझा जन्म तिथे झाला. माझी आई म्हणायची की बेटा तू नागर ब्राह्मण मुलगा आहेस. भार्गव गोत्र आहे आणि आश्विन शाखा आहे. जेव्हा तुला भीती वाटेल तेव्हा फक्त म्हण की 'या अली मदद कर'".

पुढे ते म्हणाले, "तेव्हा आम्ही हिंदूस्तानसाठी एक उदाहरण होतो. शिष्टाचाराचं रत्न होतो. सत्य असलेल्या या संस्कृतीला, जखमेसारखे वाहून नेण्याची वेळ येईल, असं कधीच वाटलं नव्हतं. पण आजही मी अभिमानाने म्हणतो की ही बहुसांस्कृतिकता आपली ओळख आहे. जर मी माझ्या कोणत्याही एका भागापासून कापला गेलो तर मी अर्धवट राहीन".

 

टॅग्स :महेश भटबॉलिवूडसेलिब्रिटीपहलगाम दहशतवादी हल्लामुस्लीम