Join us

महेश बाबूच्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत ऐकून तुम्हाला येईल भोवळ, किंग खानच्या व्हॅनिटी व्हॅनलाही देते टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 06:00 IST

महेश बाबूची व्हॅनिटी व्हॅन शाहरूख खानच्या व्हॅनिटी व्हॅनपेक्षा जास्त महागडी आहे.

साऊथचा सुपरस्टार महेश बाबू साऊथचे अभिनेते व निर्माते कृष्णा यांचा मुलगा आहे. महेश बाबूने करियरची सुरूवात वयाच्या चौथ्या वर्षी बालकलाकार म्हणून केली होती. महेश बाबूने १९९९ साली 'राजा कुमारुदु' चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केलं. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री प्रिती झिंटा मुख्य भूमिकेत होती. चित्रपटात येण्यापूर्वी त्याने तीन-चार महिने अभिनयाचे धडे गिरविले होते. 

महेश बाबू शाळेत होते तेव्हा मित्रांना आपल्या वडिलांचं नाव सांगत नव्हते. त्यांच्या वडिलांनीच त्यांना असं करायला सांगितलं होतं. कारण महेश बाबूच्या वडिलांना त्याने त्यांच्या नावाचा वापर करू नये असं वाटत होतं. महेश बाबूच्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत जवळपास ६.०२ कोटी रुपये इतकी आहे. त्याची ही व्हॅनिटी व्हॅन शाहरूख खानच्या व्हॅनिटी व्हॅनपेक्षा जास्त महागडी आहे. महेश बाबू आणि नम्रता यांचा हैदराबादमधील जुबली हिल्समध्ये बंगला आहे. या बंगल्याची किंमत जवळपास १४ कोटी रुपये आहे. 

महेश बाबूच्या पर्सनल लाईफबद्दल सांगायचं तर त्याने अभिनेत्री नम्रता शिरोडकरसोबत २००५ साली लग्न केले. महेश बाबू व नम्रता यांची पहिल्यांदा भेट २००० साली वामसी चित्रपटादरम्यान झाली होती. लग्नाच्या आधी पाच वर्षे त्यांनी एकमेकांना डेट केलं होतं.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर महेश बाबूच्या भरत एने नेनू या चित्रपटाने जगभरात २२० कोटींचं कलेक्शन केलं होतं. याशिवाय त्याचा महाऋषी चित्रपट प्रदर्शित झाला होता. 

टॅग्स :महेश बाबू