Join us

महेश बाबू चाहतीच्या भेटीमुळे भारावला, चाहतीचे वय ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 19:23 IST

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू फक्त देशभरातच लोकप्रिय नसून त्याचे चाहते जगभरात आहेत.

ठळक मुद्देमहेश बाबू सध्या 'महर्शी' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू फक्त देशभरातच लोकप्रिय नसून त्याचे चाहते जगभरात आहेत. त्याला भेटण्यासाठी व त्याच्याशी संवाद साधण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक असतात. अशीच त्याची एक चाहती नुकतीच त्याला भेटली आहे. त्याला भेटल्यानंतर त्या चाहतीला तर आनंद झालाच पण महेश बाबू तिला भेटल्यानंतर खूप भारावून गेला. 

महेश बाबू सध्या एका सिनेमाचे चित्रीकरण करतो आहे. या सेटवर त्याला भेटण्यासाठी त्याची एक चाहती आली. तिच्या भेटीमुळे तिच्यापेक्षा जास्त आनंद महेश बाबूला झाला. त्याला कारणही तसेच आहे. कारण त्याची ही खास चाहती १०६ वर्षांची आहे. रेलांगी सत्यवती असे त्यांचे नाव असून राजमुंड्री या गावातून त्या फक्त महेश बाबूला भेटण्यासाठी आल्या होत्या. महेश बाबूने तिच्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला आहे.या पोस्टमध्ये महेश बाबूने लिहिले आहे की, 'चाहत्यांच्या प्रेमामुळे मी फार भारावलो आहे. माझी पिढी सोडता दुसऱ्या पिढीतून अशा प्रकारचे प्रेम मला मिळणे ही माझ्यासाठी फार आनंदाची बाब आहे. त्यांना मला भेटून जेवढा आनंद झाला असेल, त्यापेक्षा जास्त मला त्यांना भेटून आनंद झाला आहे'.

महेश बाबू सध्या 'महर्शी' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तो हैदराबाद येथे या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. त्याचा हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :महेश बाबू