Join us

Watch Teaser : साऊथ इंडस्ट्रीत आला आणखी एक ‘HERO’, महेशबाबूशी आहे खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 16:00 IST

Watch Teaser : बॉलिवूडमध्ये स्टार किड्सच्या एन्ट्रीची चर्चा नेहमीच रंगते. पण आता साऊथ इंडस्ट्रीतील एका स्टार किडच्या एन्ट्रीची चर्चा आहे.

ठळक मुद्दे‘हिरो’ या सिनेमात अशोक गल्लाच्या अपोझिट निधी अग्रवाल दिसणार आहे. टीजरमध्ये अशोक गल्ला घोड्यावर स्वार झालेला दिसतो. दुस-याच क्षणाला तो जोकरच्या कपड्यात दिसतो.

बॉलिवूडमध्ये स्टार किड्सच्या एन्ट्रीची चर्चा नेहमीच रंगते. पण आता साऊथ इंडस्ट्रीतील एका स्टार किडच्या एन्ट्रीची चर्चा आहे. होय, साऊथ इंडस्ट्रीत एका स्टारकिडची एन्ट्री झालीये. त्याच्या पहिल्या सिनेमाचा टीजरही लॉन्च झाला आहे.या स्टार किडचे नाव आहे अशोक गल्ला (Ashok Galla). हा कोण तर साऊथचा सुपरस्टार महेशबाबू (Mahesh Babu) याचा भाचा. महेश बाबूने बुधवारी भाच्याच्या पहिल्या सिनेमाचा टीजर लॉन्च केला. ‘हिरो’ असे या सिनेमाचे नाव आहे. श्रीराम आदित्य यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे आणि अशोक गल्लाची आई पद्मावती हा सिनेमा प्रोड्यूस करतेय.अशोक गल्ला हा महेशबाबूची बहीण पद्मावती गल्ला व जावई जयदेव गल्ला यांचा मुलगा आहे.भाच्याच्या नव्या सिनेमाचा टीजर लॉन्च करताना महेश बाबूने आनंद व्यक्त केला. (Mahesh Babu launches nephew Ashok Gallas debut movie Hero teaser)

‘अशोक गल्ला, तुझ्या पहिल्या सिनेमाचा टीजर लॉन्च करताना खूप आनंद होतोय. ‘हिरो’चा प्रवास इथुन सुरू होतो...,’असे महेशबाबूने लिहिले आहे. महेशबाबूची पत्नी व बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकर हिनेही अशोकला शुभेच्छा दिल्यात.‘हिरो’ या सिनेमात अशोक गल्लाच्या अपोझिट निधी अग्रवाल दिसणार आहे. टीजरमध्ये अशोक गल्ला घोड्यावर स्वार झालेला दिसतो. तर दुस-याच क्षणाला तो जोकरच्या कपड्यात दिसतो.

महेश बाबू हा तेलगू अभिनेता कृष्णाचा मुलगा आहे. 1989 साली ‘पोरटम’ या सिनेमातून बालकलाकार म्हणून महेशबाबू दिसला होता. 1999 मध्ये ‘राजा कुमारूडू’ या सिनेमातून त्याने लीड अ‍ॅक्टर म्हणून डेब्यू केला होता. महेशबाबू साऊथ इंडस्ट्रीखा सुपरस्टार आहे. आपल्या करिअरमध्ये त्याने एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले आहेत. लवकरच त्याचा ‘सरकारू वारी पाटा’ हा सिनेमा रिलीज होतोय.

टॅग्स :महेश बाबू