महेक काम करणार मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2016 15:06 IST
नई पडोसन, वाँटेड यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री महेक चहल कवच...काली शक्तियो से या मालिकेत काम करणार आहे. महेकने ...
महेक काम करणार मालिकेत
नई पडोसन, वाँटेड यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री महेक चहल कवच...काली शक्तियो से या मालिकेत काम करणार आहे. महेकने छोट्या पडद्यावर बिग बॉस, पॉवर कपल यांसारख्या रिएलिटी शोमध्ये काम केले आहे. पण ती पहिल्यांदाच एखाद्या मालिकेत काम करत आहे. ही मालिका बालाजी टेलिफ्लिम्सची असून या मालिकेत अभिनेत्री मोना सिंग आणि अभिनेता विवेक दहियाही प्रमुख भूमिकेत आहेत. मोनाने काहीच महिन्यांपूर्वी प्यार को हो जाने दो ही बालाजी टेलिफ्लिमसोबत मालिका केली होती. पण या मालिकेला टीआरपीच्या रेसमध्ये टिकता आले नाही तर विवेक सध्या बालाजीच्याच ये है मोहब्बते या मालिकेत काम करत आहे.