अभिनेता रितेश देशमुख काल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर चांगलाच भावूक झाला. कारण काय तर रितेशचे दोन्ही भाऊ या निवडणुकीत विजयी झालेत. भावांच्या विजयानंतर रितेश देशमुख भावूक झाला. त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर भावूक पोस्ट टाकली. बाबा आम्ही करुन दाखवले, असे भावनिक ट्विट त्याने केले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देखमुख यांचे दोन्ही सुपुत्र यंदा विधानसभा निवडणुकीत विजयी झालेत. अमित देशमुख हे लातूर शहर तर धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. अमित देशमुख यांनी तिस-यांदा निवडणूक जिंकली. काँग्रेसच्या तिकीटावर लातूर शहर मतदारसंघातून अमित देशमुख यांनी 42 हजार मतांनी भाजपाच्या उमेदवाराला धूळ चारली. तर धीरज देशमुख यांनी लातूर ग्रामीणमधून विजयश्री खेचून आणला. त्यांनी १ लाख 20 हजारांच्या घरात मतांनी विरोधी प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला. रितेश देशमुखने आपल्या दोन्ही भावांच्या प्रचारात सक्रीय सहभाग घेतला होता.
बाबा, आम्ही करून दाखवलं! रितेश देशमुख झाला भावूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 12:48 IST
अभिनेता रितेश देशमुख काल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर चांगलाच भावूक झाला.
बाबा, आम्ही करून दाखवलं! रितेश देशमुख झाला भावूक
ठळक मुद्देआज रितेशची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला हाऊसफुल 4 हा सिनेमा प्रदर्शित झालाय.