Join us
Daily Top 2Weekly Top 5

मारधाड करुन गुंडांना फटकावणार काजोल! समोर प्रभूदेवा खलनायक, 'महारागनी'चा टिझर भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 16:51 IST

अभिनेत्री काजोलच्या आगामी सिनेमाचा टिझर रिलीज झालाय. बातमीवर क्लिक करुन तुम्हीही बघा (maharagni, kajol)

अभिनेत्री काजोल ही सध्या विविध सिनेमांमधून भेटीला येतेय. काजोलची क्रिती सेननसोबत आगामी वेबसिरीजची चर्चा आहे. याशिवाय काहीच महिन्यांपुर्वी रिलीज झालेल्या 'लस्ट स्टोरीज 2' मध्ये काजोल झळकली. आता काजोलच्या एका आगामी सिनेमाच्या अॅक्शनपॅक सिनेमाच्या टीझरची चर्चा आहे. हा टीझर म्हणजे 'महारागनी'.  विशेष म्हणजे या सिनेमात काजोलचा 'सिंघम' अवतार दिसत असून तिच्यासमोर प्रभूदेवा खलनायक म्हणून समोर उभा आहे.

काजोल - प्रभूदेवाचा महारागनी सिनेमाचा टिझर

'महारागनी' सिनेमाच्या टिझरमध्ये बघायला मिळतं की, सुरुवातीला डॅशिंग अवतारात प्रभूदेवाची एन्ट्री झालेली दिसते. प्रभूदेवा खलनायकाच्या भूमिकेत असून दुष्मनांना लोळवताना दिसतो. तर दुसरीकडे नसीरुद्दीन शाह शेवटच्या घटका मोजताना मुलांच्या आठवणीने व्याकूळ होताना दिसतात. अशातच दुर्गामातेची पूजा दिसून येते. आणि पॉश गाडीतून काजोल उतरते. ती मारधाड करत गुंडांना लोळवताना दिसते. काजोलचा हा 'सिंघम' अवतार थक्क करणारा आहे.

कधी रिलीज होणार महारागनी?

चरण तेज उप्पलापती दिग्दर्शित आणि लिखित आणि हरमन बावेजा आणि वेंकट अनिश डोरिगिलस निर्मित बावेजा स्टुडिओ आणि E7 एंटरटेनमेंट्सच्या लेबलखाली, 'महारागनी - क्वीन ऑफ क्वीन्स' हा हिंदी, तमिळ, तेलुगु, या भाषांमध्ये प्रदर्शित होणारा सिनेमा आहे. सिनेमात काजोस, नसीरुद्दीन शाह आणि प्रभूदेवा प्रमुख भूमिकेत आहेत. सिनेमाची अधिकृत रिलीज डेट अजून समोर आली नसली तरीही आगामी दोन महिन्यांमध्ये सिनेमा रिलीज होईल.

टॅग्स :काजोलप्रभू देवानसिरुद्दीन शाह