प्रयागराजमध्ये झालेल्या महाकुंभ मेळ्यात आल्यानंतर मोनालिसाचं आयुष्यच बदलून गेलं. मोनालिसाचे तिथले फोटो व्हायरल झाले, ज्यामुळे ती सोशल मीडिया सेन्सेशन बनली आणि आता ती चित्रपटांमध्ये नशीब आजमावत आहे. सनोज मिश्रा यांनी मोनालिसाला चित्रपटांमध्ये संधी दिली. तिने सनोज मिश्रा यांचा 'द डायरी ऑफ मणिपूर' चित्रपट साईन केला. रिपोर्टनुसार, मोनालिसाने या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे आणि आता मोनालिसाच्या हाती आणखी एक चित्रपट लागला आहे. मोनालिसाला साउथचा एक चित्रपट मिळाला आहे, ज्याची माहिती अभिनेत्रीने स्वतः दिली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोनालिसाने साउथ फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं आहे. तिने 'लाईफ' नावाचा तेलगू चित्रपट साईन केला आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, ज्यात मोनालिसाचं दणक्यात स्वागत करण्यात आलं. याच कार्यक्रमाद्वारे मोनालिसाने साउथ फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केल्याचं समोर आलं. यावेळी मोनालिसाने प्रसार माध्यमांशी संवाद साधला आणि चित्रपटाबद्दल माहिती दिली. मोनालिसाचा हा चित्रपट पॅन इंडिया स्तरावर प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या चित्रपटात मोनालिसा चरण साईसोबत दिसणार आहे, जे 'क्रश' आणि 'इट्स ओके गुरू' सारख्या चित्रपटांमुळे चाहत्यांमध्ये ओळखले जातात. या चित्रपटाची निर्मिती 'श्री वेंगमम्बा मूव्हीज'च्या बॅनरखाली अंजैया उदिनीने आणि उषा उदिनीने करत आहेत.
परदेशातही गेलीय मोनालिसानुकताच मोनालिसाचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यात ती पांढऱ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसली. मोनालिसाचा इंडो वेस्टर्न लेहंगा खूप सुंदर दिसत होता आणि कुरळ्या केसांमध्ये ती कहर करत होती. यावेळचे फोटो चाहत्यांना खूप आवडले. मोनालिसाने तिच्या पहिल्या 'द डायरी ऑफ मणिपूर' चित्रपटाव्यतिरिक्त काही म्युझिक व्हिडीओ देखील केले आहेत, ज्याचं प्रमोशन करताना ती दिसली होती. याशिवाय, ती परदेशात जाऊन आपला पहिला इव्हेंटही करून आली आहे. व्हायरल झाल्यानंतर मोनालिसा नेपाळला गेली. तिथे मोनालिसाला सन्मानित करण्यात आलं होतं.
Web Summary : Maha Kumbh photos transformed Monalisa's life. After Bollywood, she's now starring in a Telugu Pan-India film called 'Life' opposite Charan Sai. Her journey continues with music videos and international events.
Web Summary : महाकुंभ की तस्वीरों ने मोनालिसा का जीवन बदल दिया। बॉलीवुड के बाद, अब वह 'लाइफ' नामक एक तेलुगु पैन-इंडिया फिल्म में चरण साई के साथ अभिनय कर रही हैं। संगीत वीडियो और अंतर्राष्ट्रीय कार्यक्रमों के साथ उनकी यात्रा जारी है।