Join us

​माधुरी पुन्हा बनणार जज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 21:05 IST

आपली माधुरी, अर्थात माधुरी दीक्षित नेने बºयाच दिवसांपासून बॉलिवूडमधून गायब आहे. ‘झलक दिखला जा’ मधून अधूनमधून टीव्हीवर तिचे दर्शन ...

आपली माधुरी, अर्थात माधुरी दीक्षित नेने बºयाच दिवसांपासून बॉलिवूडमधून गायब आहे. ‘झलक दिखला जा’ मधून अधूनमधून टीव्हीवर तिचे दर्शन व्हायचे. पण अलीकडे तिथूनही एक्झिट मिळाल्याने माधुरी बाईचा काही पत्ता नव्हता. पण आता माधुरी पुन्हा एका डान्स रिअ‍ॅलिटी शोची जज म्हणून दिसणार आहे म्हणे! कोरिओग्राफर टेरेंस लेविस आणि बोस्को मार्टिस याच्यासोबत अमेरिकन रिअ‍ॅलिटी शो ‘सो यू थिंक, यू कॅन डॉन्स’च्या भारतीय आवृत्तीत माधुरी जज म्हणून दिसणार आहे. पुढील महिन्यापासून हा शो व्हायरल होणार आहे. स्टेज व स्ट्रीट फाईट हे डान्सचे दोन प्रकार या शोमध्ये दिसणार आहे. टेरेंसने यासंदर्भात सांगितले की, बोस्को स्ट्रीट डान्स व रॉ अर्बन शैलीच्या डान्सचा जज असेल. तर मी स्टेट सादरीकरणावर निर्णय देईल. माधुरी भारतीय शैलीच्या नृत्याचे परीक्षण करेल.