Join us

माधुरी दीक्षितला करायचं होतं अजयशी लग्न, पण एक गैरसमज आणि नातं मोडलं, काय घडलेलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 17:20 IST

माधुरी दीक्षित तिच्या पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत असते. माधुरीने १९९९मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न करत संसार थाटला. पण, त्याआधी तिचा जीव अजयवर जडला होता.

बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित आजही चाहत्यांना तिच्या सौंदर्याने भुरळ घालते. माधुरी दीक्षित तिच्या पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत असते. माधुरीने १९९९मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न करत संसार थाटला. पण, त्याआधी माधुरीला एका क्रिकेटरसोबत संसार थाटायचा होता. पण, एक गैरसमज आणि माधुरीचं क्रिकेटरशी असलेलं नातं संपलं. हा क्रिकेटर म्हणजे अजय जडेजा. 

भारतीय क्रिकेट टीमचा हॅण्डसम बॉय म्हटल्या जाणाऱ्या अजय जडेजा आणि माधुरीची प्रेम कहाणी चांगलीच चर्चेत होती. एका मॅगझिनच्या फोटोशूटसाठी ते एकमेकांना भेटले होते आणि प्रेमात पडले. माधुरी आणि अजय लग्नही करणार होते. पण, त्यांच्या कुटुंबीयांना हे नातं पसंत नव्हतं. अजय जडेजा आणि माधुरी दीक्षितच्या कुटुंबात खूप अंतर होतं. कारण जडेजा नवानगरमधील शाही कुटुंबातील होता तर माधुरी दीक्षिता सामान्य घरातील होती. 

१९९९ साली जेव्हा अजय जडेजाचं नाव मॅच फिक्सिंगमध्ये आलं त्यानंतर त्याचं क्रिकेटमधील करिअर संपुष्टात आलं. यानंतर माधुरी दीक्षितच्या कुटुंबानं तिला अजयपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. त्यानंतर माधुरी दीक्षित आणि अजय जडेजा यांचं नातं तुटलं आणि त्यांची प्रेमकहाणी अधुरीच राहिली. 

टॅग्स :माधुरी दिक्षितसेलिब्रिटी