बॉलिवूडची ‘धक धक’ गर्ल माधुरी दीक्षित हिचे क्रेज अद्यापही कमी झालेले नाही. ‘अबोध’ या चित्रपटातून माधुरीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि पुढे सौंदर्य व सुंदर हास्याने रिझवणारी ही ‘धक धक’ गर्ल चाहत्यांच्या मनात घर करून बसली. आपल्या अदांनी, सौंदर्याने आणि नृत्याने घायाळ करणारी हीच माधुरी आता नवी इनिंग सुरु करणार आहे. होय, अभिनय आणि नृत्य यानंतर ती पॉप म्युझिकच्या क्षेत्रात पदार्पण करतेय.
माधुरी दीक्षित बनणार पॉप सिंगर! यावर्षी रिलीज होणार पहिला म्युझिक अल्बम!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 14:35 IST
आपल्या अदांनी, सौंदर्याने आणि नृत्याने घायाळ करणारी हीच माधुरी आता नवी इनिंग सुरु करणार आहे. होय, अभिनय आणि नृत्य यानंतर ती पॉप म्युझिकच्या क्षेत्रात पदार्पण करतेय.
माधुरी दीक्षित बनणार पॉप सिंगर! यावर्षी रिलीज होणार पहिला म्युझिक अल्बम!!
ठळक मुद्देयेत्या १७ तारखेला माधुरीचा ‘कलंक’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय. या चित्रपटात माधुरी व संजय दत्तची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करेल.