Join us
Daily Top 2Weekly Top 5

​माधुरी दीक्षित आता एका नव्या रूपात...वाचा सविस्तर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 14:44 IST

बॉलिवूडची डान्सिंग क्वीन अर्थात माधुरी दीक्षित सध्या कुठे आहे? तर आपल्या इंग्रजी भाषेतील पहिल्या म्युझिकल रेकॉर्डिंगची (ईपी) तयारी करतेय. ...

बॉलिवूडची डान्सिंग क्वीन अर्थात माधुरी दीक्षित सध्या कुठे आहे? तर आपल्या इंग्रजी भाषेतील पहिल्या म्युझिकल रेकॉर्डिंगची (ईपी) तयारी करतेय. होय, म्हणजेच माधुरी संगीत क्षेत्रात डेब्यू करतेय. ‘द फिल्म स्टार’ हा अल्बम घेऊन ती येतेय. या अल्बममधील ‘तू है मेरा’ हे सिंगल माधुरी गाणार आहे. हे गाणे माधुरी तिच्या चाहत्यांना समर्पित करणार आहे. चाहत्यांकडून मिळालेले प्रेम आणि पाठींबा यासाठी ती हे खास गाणे गाणार आहे.आपल्या या नव्या प्रवासाबद्दल माधुरी प्रचंड उत्सूक आहे. आधीपासून संगीत हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग राहिला आहे. माझ्या करिअरमध्ये चाहत्यांनी मला भरभरून प्रेम दिले. त्याची उतराई मला करता येणार नाही. पण माझ्या या सर्व चाहत्यांचे आभार मानण्यासाठी मी एक नवा अध्याय सुरु करू इच्छिते, असे माधुरी म्हणाली. माधुरी गाणार असलेले हे गाणे पॉप आणि शास्त्रीय संगीताचे फ्युजन असेल. लोकांच्या आत्म्यापर्यंत पोहोचेल, असे गाणे बनवण्याचे आमचे प्रयत्न आहेत. श्रोत्यांना माझे हे गाणे नक्की आवडेल, अशी मी आशा करते, असेही ती म्हणाली.ALSO READ : अनिल कपूरमुळेच माधुरी दीक्षितने अमिताभ बच्चनसोबत कधीही केले नाही काम!या गाण्याची कल्पना कशी आली, हेही माधुरीने सांगितले. गतवर्षी मी, माझा नवरा श्रीराम नेने आणि ए अ‍ॅण्ड आर वर्ल्डवाईड( आर्टिस्ट डिस्कव्हरी अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट कंपनी) चा फाऊंडर सॅट बिसला आम्ही एकत्र बसलो असताना ही कल्पना समोर आली, असे तिने सांगितले.आता माधुरी आपल्या या नव्या प्रवासात कुठल्या मुक्कामाला पोहोचते, ते बघूच. तूर्तास तरी या नव्या प्रवासासाठी तिला मनापासून शुभेच्छा देऊ यात!