Join us
Daily Top 2Weekly Top 5

माधुरी दीक्षितने चक्क हॉकी स्टीक घेऊन केला होता आमीर खानचा पाठलाग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 14:06 IST

​बॉलिवूडची धकधक गर्ल अर्थात माधुरी दीक्षित-नेने हिचे आजही अनेक दीवाने आहेत. ९० च्या दशकात तर माधुरीचा असा काही जलवा होता की, तिची एक झलक बघण्यासाठी चाहते आतूर असायचे.

बॉलिवूडची धकधक गर्ल अर्थात माधुरी दीक्षित-नेने हिचे आजही अनेक दीवाने आहेत. ९० च्या दशकात तर माधुरीचा असा काही जलवा होता की, तिची एक झलक बघण्यासाठी चाहते आतूर असायचे. चाहतेच नव्हे तर अनेक बॉलिवूड स्टार्सही तिच्यासोबत काम करण्यास एका पायावर तयार असायचे. यामध्ये बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमीर खान याचेही नाव आहे. आमीरही त्याकाळी माधुरीवर अक्षरश: फिदा होता. मात्र जेव्हा ही बाब माधुरीच्या लक्षात आली तेव्हा चक्क हॉकी स्टीक घेऊन ती त्याच्या मागे लागली होती. हा किस्सा १९९० चा आहे. रोमांस-ड्रामा जॉनर चित्रपट ‘दिल’ची शूटिंग सुरू होती. यामध्ये माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत होती. तर तिच्या अपोझिट आमीर खान होता. त्यावेळी आमीर माधुरीच्या सौंदर्यांवर भाळला होता. तो तिच्यावर प्रेम करू लागला. मात्र हे सर्व काही मौजमस्तीमध्ये सुरू होते. कारण आमीर सेटवर खूप मस्ती करायचा. माधुरीसोबत तर तो फ्लर्ट करण्याची एकही संधी सोडत नसे. एके दिवशी आमीर माधुरीसोबत असेच फ्लर्ट करीत होता. परंतु माधुरीला आमीरचा हा स्वभाव फारसा पसंत आला नाही. तिने बाजूला असलेली एक हॉकी स्टीक हातात घेतली अन् चक्क त्याच्या मागे लागली. त्यानेही माधुरीचा अवतार बघून एकच धूम ठोकली. दूरपर्यंत माधुरीने आमीरचा पाठलाग केला; मात्र त्याला पकडू शकली नाही. कारण आमीर खूपच जोरात पळायचा. असे म्हटले जात आहे की, या घटनेनंतरही आमीर आणि माधुरीमधील संबंध बिघडले नव्हते. फक्त तेवढेपुुरताच माधुरीला त्याचा राग आला होता, त्यामुळेच ती हॉकी स्टीक घेऊन आमीरच्या मागे लागली होती. असो, दोघांमध्ये आजही चांगली मैत्री असून, त्यांच्यातील संबंधांमध्ये कुठल्याही प्रकारची कटुता आलेली नाही. दोघांचा हा चित्रपट त्याकाळी बॉक्स आॅफिसवर प्रचंड हिट राहिला. या चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठावर आहेत.