क्रिकेट आणि बॉलिवूडचं नातं खूप जुनं आहे. भारतीय क्रिकेट टीममध्ये असे बरेच क्रिकेटर्स आहेत जे बॉलिवूड अभिनेत्रींच्या प्रेमात पडले आहेत. त्यातील काहींनी लग्न केले तर काहींना प्रेम मिळालं पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. या यादीत क्रिकेट जगतातील चर्चेत राहिलेला क्रिकेटर अजय जडेजाच्या नावाचादेखील समावेश आहे. भारतीय क्रिकेट टीमचा हॅण्डसम बॉय म्हटल्या जाणाऱ्या अजय जडेजा (Ajay Jadeja) आणि बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित(Madhuri Dixit)च्या अफेयर्सच्या खूप चर्चा रंगल्या होत्या. मात्र काही कारणास्तव त्यांची ही प्रेमकहाणी अपूर्ण राहिली.
बॉलिवूडमध्ये माधुरी दीक्षितची ९०च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये गणना केली जाते. अजय जडेजा आणि माधुरी दीक्षित पहिल्यांदा एका मॅगझिनच्या फोटोशूटदरम्यान भेटले होते. पहिल्या भेटीत त्यांच्यामध्ये खूप चांगली मैत्री झाली होती. त्यानंतर दोघे एकमेकांना भेटले आणि हळूहळू त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले. त्या दोघांनी एकमेकांसोबत जगण्या मरण्याची शप्पथ घेतली होती. मात्र त्याच्या कुटुंबाला हे नातं पसंत नव्हते. अजय जडेजा आणि माधुरी दीक्षितच्या कुटुंबात खूप अंतर होतं. कारण जडेजा नवानगरमधील शाही कुटुंबातील होता तर माधुरी दीक्षिता सामान्य घरातील होती.
मॅच फिक्सिंगमध्ये नाव आल्यामुळे संपलं नातंअसं सांगितले जाते की, जेव्हा अजय आणि माधुरी एकत्र आले तेव्हा जडेजाचे क्रिकेट करिअरला उतरती कळा लागली. याबद्दल कधीच अजय जडेजा बोलला नाही. मात्र १९९९ साली अचानक त्याचं नाव मॅच फिक्सिंगमध्ये आलं होतं. त्यानंतर माधुरी दीक्षितच्या कुटुंबानं तिला अजयपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. मॅच फिक्सिंगमध्ये अजय जडेजाचं नाव आल्यानंतर माधुरी त्याच्यापासून दूर अमेरिकेत गेली आणि तिथे डॉ. श्रीराम नेनेसोबत तिचे अफेयर जमले आणि मग त्यांनी लग्न केले.