Join us

मधुर भांडारकरच्या 'इंदू सरकार' सिनेमात सत्तरच्या दशकातील प्रसिद्ध कव्वाली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2017 11:33 IST

हिंदी चित्रपटसृष्टीला वास्तववादी सिनेमा देणारे दिग्दर्शक अशी मधुर भांडारकर यांची ओळख. भारताच्या पहिल्या महिला  पंतप्रधान आणि आयर्न लेडी अशी ...

हिंदी चित्रपटसृष्टीला वास्तववादी सिनेमा देणारे दिग्दर्शक अशी मधुर भांडारकर यांची ओळख. भारताच्या पहिल्या महिला  पंतप्रधान आणि आयर्न लेडी अशी ओळख असणा-या इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित इंदू सरकार नावाचा सिनेमा आता मधुर भांडारकर घेऊन येत आहेत. या सिनेमाचं पहिलं गाणं मधुर भांडारकर यांनी सोशल मीडियावरुन रिलीज केलंय. 1970 च्या दशकात सुपरडुपर हिट ठरलेल्या ''चढता सूरज धीरे धीरे'' या कव्वालीचं नवं व्हर्जन या इंदू सरकारमध्ये पाहायला मिळणार आहे. सध्या सिनेमांमध्ये जुनी गाजलेली गाणी नव्या रुपात रसिकांच्या भेटीला आणली जात आहेत. मात्र एखादी जुनी कव्वाली पुन्हा रसिकांसाठी आणली गेली नव्हती. चढता सूरज धीरे धीरे या कव्वालीमुळे ही कमतरता भरुन निघेल असा विश्वासही मधुर भांडारकरने ट्विटरवर व्यक्त केला आहे. मी आणि अन्नू मलिक एकत्र बसलो आणि कोणती कव्वाली घेता येईल याचा विचार करत होता. त्यावेळी 70च्या दशकात गाजलेली ही कव्वाली नव्या रुपात घेण्याचं ठरलं असंही भांडारकर यांनी सांगितले आहे. या सिनेमात अभिनेत्री सुप्रिया विनोद इंदिरा गांधींची प्रमुख भूमिका साकारत असून नील नितीन मुकेश संजय गांधी यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. अभिनेता अनुपम खेर, अभिनेत्री किर्ती कुल्हारी हिचीही या सिनेमात भूमिका असणार आहे. सुरूवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थेला आणि राजकीय नेत्यांना काहीतरी सांगण्याचा या कव्वालीमधून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. 'इंदू सरकार’चा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच या विषयी वाद सुरू आहे. काही नेत्यांनी या सिनेमाच्या रिलीजवर आक्षेप घेतला आहे. मधुर भांडारकरने मात्र इंदू सरकार या सिनेमावर आक्षेप घेण्यासारख्या कोणत्याही गोष्टी दाखवल्या नसल्याचे स्पष्ट केले आहे. सिनेमाच्या ट्रेलरला ज्या पद्धतीने रसिकांची पसंती मिळाली त्याच पद्धतीने या कव्वाली रसिकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.