Join us  

मधुर भांडारकर बनवणार बॉलिवूड स्टार्सच्या बायकांवर चित्रपट! ठरले टायटल!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 11:19 AM

दिग्दर्शक मधुर भांडारकर वास्तववादी चित्रपटांसाठी ओळखले जातात. वास्तविक आयुष्यावरचे त्यांचे अनेक चित्रपट गाजलेत. यात फॅशन, हिरोईन, पेज 3, ट्रॅफिक सिग्नल अशा अनेक चित्रपटांचा उल्लेख करता येईल. हेच मधुर भांडारकर पुन्हा एकदा एक वास्तववादी चित्रपट घेऊन येणार आहेत.

ठळक मुद्देमध्यंतरी मधुर स्टारकिड तैमूरवर चित्रपट बनवणार, अशी चर्चा होती. यासाठी त्यंनी ‘तैमूर’ हे टायटल रजिस्टर केल्याचेही म्हटले गेले होते.

दिग्दर्शक मधुर भांडारकर वास्तववादी चित्रपटांसाठी ओळखले जातात. वास्तविक आयुष्यावरचे त्यांचे अनेक चित्रपट गाजलेत. यात फॅशन, हिरोईन, पेज 3, ट्रॅफिक सिग्नल अशा अनेक चित्रपटांचा उल्लेख करता येईल. हेच मधुर भांडारकर पुन्हा एकदा एक वास्तववादी चित्रपट घेऊन येणार आहेत. होय, चर्चा खरी मानाल तर बॉलिवूड स्टार्सच्या बायकांवर चित्रपट बनवण्याची त्यांची योजना आहे. त्यांचा हा चित्रपट गौरी खान, मीरा राजपूत, ट्विंकल खन्ना यासारख्या स्टार्स पत्नींवर आधारित असेल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुर यांनी या चित्रपटावर काम सुरु केले आहे. ‘बॉलिवूड वाइव्स’ असे या चित्रपटाचे नाव असेल. तथापि मधुर यांच्या प्रवक्त्याने मात्र या वृत्तास नकार दिला आहे. सध्या केवळ ‘बॉलिवूड वाइव्स’ हे टायटल रजिस्टर करण्यात आले आहे. पण तूर्तास यावर चित्रपट बनवण्याची कुठलीही योजना नाही, असे या प्रवक्त्याने सांगितले. आता काय खरे नि काय खोटे, ते आम्हाला ठाऊक नाही. पण मधुर भांडारकर यांनी खरोखर स्टार्सच्या बायकांवर चित्रपट आणला तर तो तुफान गाजेल, यात शंका नाही.

मध्यंतरी मधुर स्टारकिड तैमूरवर चित्रपट बनवणार, अशी चर्चा होती. यासाठी त्यंनी ‘तैमूर’ हे टायटल रजिस्टर केल्याचेही म्हटले गेले होते. पण अगदी अलीकडे मधुर यांनी स्वत:च असे काहीही नसल्याचे स्पष्ट केले. माझ्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत अनेक टायटल रजिस्टर होत आहेत. यात अवार्डस आणि बॉलिवूड वाइव्स अशा टायटलचा समावेश आहे. पण मी तैमूरवर कुठलाही चित्रपट बनवत नाहीये, असे त्यांनी स्पष्ट केले होते. काही दिवसांपूर्वी मधुर यांनी आपल्या एका चित्रपटासाठी शाहरूख खानसोबत चर्चा चालवली असल्याची चर्चा होती. हा चित्रपट इन्स्पेक्टर गालिबच्या आयुष्यावर बेतलेला असेल, असे म्हटले गेले होते.

टॅग्स :मधुर भांडारकर