Join us
Daily Top 2Weekly Top 5

लेकीच्या लग्नात नाराज होत्या मधु चोप्रा, लग्नाच्या दीड वर्षांनंतर पहिल्यांदाच उघडपणे बोलली प्रियंका चोप्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 08:00 IST

प्रियंकाने एलिन डिजेनरस हिच्या लोकप्रिय चॅट शोवर हजेरी लावली. यावेळी तिने हा खुलासा केला.

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनासच्या लग्न होऊन जवळपास दीड वर्ष झाले आहे. दोघांनी उदयपूरच्या उमेद भवनमध्ये मोठ्या धुमधडाक्यात लग्न केले. या शाही लग्नाला जवळपास 200 पाहुण्यांना बोलवण्यात आले होते. प्रियंकाची आई मधु चोप्रा लग्नातील पाहुण्यांच्या संख्येला घेऊन नाराज होत्या याचा खुलासा प्रियंकाने स्वत: केला आहे. 

 प्रियंकाने एलिन डिजेनरस हिच्या लोकप्रिय चॅट शोवर हजेरी लावली. यावेळी तिने हा खुलासा केला. ‘ माझे लग्न एक ग्रण्ड इव्हेंट होता. लग्नाला केवळ २०० पाहुणे होते. ज्यात माझ्या व निकच्या कुटूंबातील सदस्यांचा समावेश होता. पण या लग्नात माझी आई पूर्णवेळ नाराज होती. लग्नात मी सगळ्यांना बोलावले नाही, अशी तिची तक्रार होती. अगदी माझा हेअर ड्रेसर, ज्वेलरी डिझाईनरला निमंत्रण का दिले नाही? हेच ती विचारत होती, असे प्रियंकाने सांगितले.

मी एक खास पार्टी आयोजित करावी आणि त्यात जवळपास १५ हजार जवळच्या लोकांना बोलवावे, असाही तिचा आग्रह होता. मुलीच्या लग्नात प्रत्येकजण यावे, अशी तिची इच्छा होती आणि ही इच्छा पूर्ण न झाल्याने ती पूर्णवेळ नाराज होती, असेही प्रियंकाने सांगितले.

टॅग्स :प्रियंका चोप्रा