अशी मिळाली माधवनला सी हॉक्समधली भूमिका...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2016 11:28 IST
नव्वदीच्या दशकातील सी हॉक्स ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेत आर.माधवन, अनुप सोनी, सिमोन सिंग, निकी अनेजा, मनोज ...
अशी मिळाली माधवनला सी हॉक्समधली भूमिका...
नव्वदीच्या दशकातील सी हॉक्स ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेत आर.माधवन, अनुप सोनी, सिमोन सिंग, निकी अनेजा, मनोज पावा, ओम पुरी, मिलिंद सोमण, मिलिंद सोमण यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या मालिकेतील आर.माधवन तर आज सुपरस्टार बनला आहे. माधवनने रहना है तेरे दिल मैं, रंग दे बसंती, थ्री इडियट्स यांसारखे एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. आज बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अशा दोन्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याने आपले स्थान निर्माण केले आहे. माधवन आज रूपेरी पडदा गाजवत असला तरी त्याच्या कारकिर्दीची सुरुवात त्याने छोट्या पडद्यापासूनच केली आहे. बनेगी अपनी बात, घर जमाई, साया यांसारख्या मालिकांमुळे तो प्रसिद्धीझोतात आला. सी हॉक्स ही मालिका तर त्याच्या करियरला टर्निंग पॉईंट देणारी ठरली. ही मालिका माधवनला कशी मिळाली याचा खूप छान किस्सा आहे. या मालिकेचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा सांगतात, "नव्वदीच्या दशकात कोणत्याही भूमिकेसाठी स्क्रीन टेस्ट वगैरे घेण्याची पद्धतच नव्हती. मी माधवनला ओळखत होतो. तो खूप चांगला अभिनेता असल्याचे मला माहीत होते. सी हॉक्स या मालिकेतील प्रीत या भूमिकेसाठी माधवन योग्य असल्याचे मला वाटले आणि त्यामुळे मी त्याला फोन करून भेटायला बोलावले. भेटल्यावर मालिकेच्या कथानकावर आणि माधवनच्या भूमिकेवर आमची चर्चा झाली. त्याला त्याची भूमिका सांगताना माझ्या डोळ्यासमोर तो मला त्या व्यक्तिरेखेतच दिसत होता. अशाप्रकारे माधवन माझ्या सी हॉक्स या मालिकेचा भाग बनला."