बाळ ठरणार ' उडता पंजाब ' साठी लकी चार्म ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 15:54 IST
शाहिद आणि मीरा या बी-टाऊनच्या जोडीच्या जीवनात नवा पाहुणा येतोय. हा पाहुणा म्हणजे त्याचं गोंडस बाळ... बाळाच्या आगमनासाठी शाहिद ...
बाळ ठरणार ' उडता पंजाब ' साठी लकी चार्म ?
शाहिद आणि मीरा या बी-टाऊनच्या जोडीच्या जीवनात नवा पाहुणा येतोय. हा पाहुणा म्हणजे त्याचं गोंडस बाळ... बाळाच्या आगमनासाठी शाहिद एक्साईटेड आहेच.. त्याचवेळी शाहिदच्या आगामी उडता पंजाब सिनेमाच्याही चर्चा सुरु आहेत..या सिनेमात शाहिदचा वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे.. गेल्या काही दिवसांपासून शाहिदची जादू बॉक्स ऑफिसवर काहीशी फिकी पडली आहे.. एकही त्याचा सिनेमा रुपेरी पडद्यावर हिट ठरलेला नाही.. त्यामुळं आता हे बाळ बाबा शाहिदच्या आयुष्यात लकी चार्म घेऊन येणार का याकडं रसिकांच्या नजरा लागल्यात...एकीकडे लकी बाळाविषयी चर्चा सुरु असताना ट्विटरवरही शाहिदला फॅन्सकडून विचारणा होऊ लागली आहे. बाप बनणार असल्याची भावनाच इतकी ग्रेट आहे की त्याबाबत मी उत्साही आहे हे बोलणंही त्या आनंदापुढं तोकडं वाटेल असं शाहिदनं म्हटलं आहे.. तसंच बाळाचं नाव काय असेल अशी विचारणाही शाहिदला झाली.. तेव्हा सूचनांचं स्वागतच असेल असं शाहिदनं म्हटलं आहे.