देसी गर्लचा अविस्मरणीय ‘तेक्विला शॉट’ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 22:24 IST
नुकतेच आॅस्करमध्ये प्रियंका चोप्राच्या उपस्थितीने भारताचा ऊर अभिमानाने भरून आला.
देसी गर्लचा अविस्मरणीय ‘तेक्विला शॉट’ !
नुकतेच आॅस्करमध्ये प्रियंका चोप्राच्या उपस्थितीने भारताचा ऊर अभिमानाने भरून आला. रेड कार्पेटवरील तिची एन्ट्री केवळ भारतीय माध्यमांसाठीच महत्त्वाची होती असे नव्हे तर अमेरिकन माध्यमांनी देखील तिला चांगलीच दाद दिली. पीसीचा ‘बेस्ट ड्रेस’ लिस्टमध्ये समावेश होता. तिच्या आत्मविश्वासाच्या रहस्याचा उलगडा नुकताच झाला.तो म्हणजे तिने तिथे घेतलेले तेक्विला शॉट किंवा लिक्विड करेज, असे तिलाच म्हणायला आवडले. ‘द जिमी किमेल’ हा गुलीर्माेचा अमेरिकन टीव्ही जस्ट फनसाठी आॅस्करच्या सोहळयात गेला. तिथे त्याने ‘आॅस्कर-ए- वॉटर’ सेलिब्रिटींना देऊ केले. तेक्विला पिल्यानंतरची देसी गर्लची प्रतिक्रिया खुप अमेझिंग होती.