Join us
Daily Top 2Weekly Top 5

​लव्ह यू फॅमिली'चा ट्रेलर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2017 17:51 IST

लव्ह यू फॅमिली'चा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते भरत शहा यांच्या हस्ते ...

लव्ह यू फॅमिली'चा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते भरत शहा यांच्या हस्ते लव्ह यू फॅमिली या चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच करण्यात आले.सचिन्द्र शर्मा यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाचे म्युझिक झी म्युझिक कंपनी द्वारे रिलीज करण्यात आले आहे. विपुल देवानी आणि  डी .एस. भाटिया हे या सिनेमाचे निर्माते असून भरत शाह हे या सिनेमाचे प्रेझेंटर आहेत. तर भावेश भट्ट आणि मयूर पटेल हे या सिनेमाचे सहनिर्माते आहेत.या सिनेमाच्या म्युझिक लाँच सोहळ्याला बॉलिवूड मधील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. या सिनेमातील सुमधुर गाण्यांना संगीत दिग्दर्शक विष्णु नारायण, नरेश कारवाल, तन्मय पाहवा, रोबी बादल यांनी संगीत दिलंय. तर या सिनेमातील गाणी सोनू निगम, दिलेर मेहंदी, मधुश्री, प्रथमेश, कल्पना, जुबिन गर्ग आणि गरिमा याग्निक यांनी गायली आहेत. अनेक प्रसिद्ध गायक या चित्रपटासाठी एकत्र आल्याने अनेक सुमधुर गाणी रसिकांना या चित्रपटात ऐकायला मिळणार आहेत.या रोमँटिक सिनेमात सलमान यूसुफ खान, अक्शा परदासनी, कश्यप, मनोज जोशी, नवनी परिहार, सोनिका गिल, राजेश शर्मा, सुनील पाल, आशिष गोखले, सागरिका, हिया सिंह, गार्गी पटेल, बाल कलाकार नम्र दीवानी आणि शक्ति कपूर यांच्या भूमिका आहेत. सलमान युसुफ खान डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमामुळे नावारूपाला आला. या  डान्स रिअॅलिटी शो नंतर तो अनेक रिअॅलिटी शोमध्ये झळकला. एक चांगला डान्सर म्हणून त्याला ओळखले जाते.