अलिया शूजच्या प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 16:06 IST
एखादा ड्रेस घातल्यावर त्यावर कोणते शूज घालायचे, त्यावर आपले शूज सूट होतील हा आपण नेहमीच विचार करतो. स्पोर्ट शूज ...
अलिया शूजच्या प्रेमात
एखादा ड्रेस घातल्यावर त्यावर कोणते शूज घालायचे, त्यावर आपले शूज सूट होतील हा आपण नेहमीच विचार करतो. स्पोर्ट शूज हे आपण जीन्स अथवा थ्री फोर्थवर घालतो. स्पोर्ट शूज वनपीस अथवा स्कर्टवर घातल्यास ते खूपच वाईट दिसतात. त्यामुळे आपण स्पोर्ट शूज वनपास आणि स्कर्टवर घालणे शक्यतो टाळतो. पण स्टाईल आयकॉन मानली जाणारी आलिया भट्ट सध्या सगळ्याच कार्यक्रमात आपल्याला स्पोर्ट शूजमध्ये पाहायला मिळत आहे. कोणतेही कपडे घातले असल्यास आलिया त्यावर स्पोर्ट शूजच घालणे पसंत करते.एम क्रिम या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला तिने वनपीसवर पांढरे शूज घातले होते. उडता पंजाब या चित्रपटाच्यावेळी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतींच्यावेळीदेखील तिने निळ्या वनपीसवर स्पोर्ट शूज घातले होते. उडता पंजाबच्या स्क्रिनिंगला आलियाने हॉप पँटवर पिवळ्या रंगाचे फंकी शूज घातले होते.