माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन हिच्या आयुष्यात पुन्हा एका व्यक्तिची एन्ट्री झाली आहे. होय, गेल्या काही दिवसांत ही व्यक्ति अनेकदा सुश्मितासोबत दिसली. या व्यक्तिचे नाव आहे,रोहमन शॉल. आता हे नाव ऐकून आम्ही सुश्मिताच्या लव्ह लाईफबद्दल बोलतोय, हे तर तुम्हाला कळले असेलच. होय, गेल्या काही दिवसांपासून सुश्मिता रोहमनला डेट करत असल्याची चर्चा आहे. रोहमन एक मॉडल आहे. काल-परवा रोहमन आणि सुश्मिता एकत्र एअरपोर्टवर दिसले. यावेळी दोघांच्याही चेहऱ्यांवरून आनंद ओसंडून वाहत होता. त्यापूर्वी मुंबई फॅशन वीकमध्येही रोहमन दिसला़ सुश्मिता रॅम्प वॉक करत असताना रोहमन तिला चीअर करत होता. रोहमनसोबत सुश्मिताच्या दोन्ही मुलीही यावेळी हजर होत्या.
Love is in the air: आता ‘या’ मॉडेलवर जडला सुश्मिता सेनचा जीव!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 20:57 IST