Join us

लॉस एंजलिसला होणार पीसी शिफ्ट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2016 16:16 IST

 प्रियांका चोप्रा लवकरच लॉस एंजलिसला शिफ्ट होणार आहे. तिची आंतरराष्ट्रीय टीव्ही सीरियल ‘क्वांटिको’ ची तारीख वाढविण्यात आली आहे. त्यामुळे ...

 प्रियांका चोप्रा लवकरच लॉस एंजलिसला शिफ्ट होणार आहे. तिची आंतरराष्ट्रीय टीव्ही सीरियल ‘क्वांटिको’ ची तारीख वाढविण्यात आली आहे. त्यामुळे तिला तिथे राहणे अनिवार्य आहे. आगामी पाच वर्षांसाठी त्या शो ची शूटींग सुरूच राहणार आहे.‘क्वांटिको २’वरही ते अवलंबून आहे. तसेच तिला बॉलीवूड चित्रपटांच्या आॅफर्सही मिळत आहेत. तिने लॉस एंजलिस येथे एक अपार्टमेंट विकत घेतले आहे. तिथेच अपार्टमेंट घेतल्याने तिला तिच्या हॉलीवूडमधील करिअरसाठी खुप फायदा होणार आहे. तिची आई डॉ. मधु चोप्रा ही देखील आता पीसीचे प्रोडक्शन हाऊस सांभाळणार आहे.