Join us

‘लुटेरा’ला ७ वर्षे पूर्ण; पती रणवीर सिंगबद्दल पत्नी दिपीका म्हणाली, असं काही...!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 17:30 IST

कथानक, स्टारकास्ट आणि संगीत यांनी परिपूर्ण असलेला या चित्रपटाने त्यावेळी प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटाने नुकतेच ७  वर्षे पूर्ण केले आहेत. यानिमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिच्या पतीच्या भूमिकेचे तोंडभरून कौतुक केले.

बॉलिवूडचा अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांची अफलातून केमिस्ट्री आपण ‘लुटेरा’मध्ये अनुभवली. कथानक, स्टारकास्ट आणि संगीत यांनी परिपूर्ण असलेला या चित्रपटाने त्यावेळी प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटाने नुकतेच ७  वर्षे पूर्ण केले आहेत. यानिमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिच्या पतीच्या भूमिकेचे तोंडभरून कौतुक केले. तुम्हाला वाचायला नक्की आवडेल ती काय म्हणाली ते...वाचा तर मग...

विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित ‘लुटेरा’ हा चित्रपट ५ जुलै २०१३ रोजी प्रदर्शित झाला होता. तिने लुटेरा या चित्रपटाविषयी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याला तिने कॅप्शन दिले आहे की, ‘तुझ्या सर्वांत चांगल्या परफॉर्मन्सेसपैकी एक भूमिका’. याशिवाय चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, अमृता खानविलकर, सोनम बाजवा, जोया अख्तर, निम्रत कौर या सर्वांनी या व्हिडीओला कमेंट केले आहे.

रणवीर सिंगसोबत विक्रमादित्य मोटवानी आणि सोनाक्षी सिन्हा यांनीही व्हिडीओ शेअर केला आहे. या चित्रपटाची स्टोरी ‘ओ हेन्री यांच्या शॉर्ट स्टोरी द लास्ट थीफ ’ या पुस्तकावर आधारित आहे. हा चित्रपट  १९५० च्या काळातील आहे.            

           

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंगसोनाक्षी सिन्हा