Join us

​पाहा, आराध्या आणि अबराम यांच्या स्कूल अ‍ॅन्युअल डे फंक्शनचे काही खास व्हिडिओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 12:31 IST

काल धीरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलचे अ‍ॅन्युअल डे फंक्शन झाले. या फंक्शनची मोठ्ठी बातमी झाली कारण, ऐश्वर्या राय बच्चन व अभिषेक बच्चनची मुलगी आराध्या, शाहरूख खानचा मुलगा अबराम अशा सर्वांनी या अ‍ॅन्युअल डे फंक्शनमध्ये परफॉर्म केला.

शाळेत जाणा-या बच्चे कंपनीसाठी अ‍ॅन्युअल डे फंक्शन काय असते, हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. केवळ बच्चेकंपनीचं नाही तर त्यांचे पालकही या दिवशी कमालीचे एक्ससाईटेड असतात. मग ते सामान्य पालक असो किंवा सेलिब्रिटी पालक़ होय, काल धीरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलचे अ‍ॅन्युअल डे फंक्शन झाले. या फंक्शनची मोठ्ठी बातमी झाली कारण, ऐश्वर्या राय बच्चन व अभिषेक बच्चनची मुलगी आराध्या, शाहरूख खानचा मुलगा अबराम अशा सर्वांनी या अ‍ॅन्युअल डे फंक्शनमध्ये परफॉर्म केला. मुलांचे कौतुक पाहायला त्यांचे सेलिब्रिटी मॉम-डॅडही पोहोचले. आराध्याचे मॉम डॅड, अबरामचा डॅड सगळेच याठिकाणी दिसलेत. सगळ्यांनी आपल्या मुलांना चीअरअप केले. या फंक्शनचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. यात ऐश्वर्याची लाडकी लेक आराध्या स्टेजवर परफॉर्म करताना दिसतेय. स्टेजवर चिमुकली आराध्या पांढरा आणि लाल रंगाच्या शॉर्ट फ्रॉकमध्ये दिसलेय. तिच्यासारखाच तिचा डान्सही क्यूट आहे, हे सांगायला नकोच. निश्चितपणे मुलीचा स्टेजवरचा हा परफॉर्मन्स पाहून ऐश्वर्याचा ऊर भरून आला असणार. या व्हिडिओमध्ये आराध्याचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. पण थोडे काळजीपूर्वक पाहिल्यावर तुम्ही तिला ओळखू शकता.अन्य एका व्हिडिओत शाहरूखचा लाडका अबराम दिसतोय. आराध्याची एक झलकही यात पाहायला मिळतेय. या व्हिडिओत ओम शांती ओम या गाण्यावर धीरूबाई अंबानी स्कूचीस सगळी मुले डान्स करताहेत. उपस्थितांमध्ये शाहरूखही काही डान्स स्ेटप करताना दिसतोय. लाडका अबरामही यात थिरकताना दिसतोय. तिकडे ऐश्वर्याही ताल धरताना दिसतेय. एकंदर काय तर अबराम असो वा आराध्या दोघेही आपल्या सेलिब्रिटी मॉम, डॅडपेक्षा कुठेही कमी नाहीय, हेच यावरून दिसते. या धम्माल अ‍ॅन्युअल डेचा व्हिडिओ तुम्ही पाहायलाच हवा आणि कसा वाटला, तेही आम्हाला सांगायला हवे.