अजयच्या या ट्विटनंतर एक गोष्ट स्पष्ट झाली होती की, या ट्रकमध्ये सहा प्रवाशी आहेत. एक तर या ट्रकला लुटण्याचा प्रयत्न केला जात आहे किंवा लुटारूंपासून वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र हे सर्व किंतू-परंतु चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतरच स्पष्ट होतील. चित्रपटाचे दिग्दर्शन मिलन लुथरिया करीत आहेत. या अगोदर त्यांनी ‘कच्चे धागे, चोरी चोरी, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई आणि ‘द डर्टी पिक्चर’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. दरम्यान, ‘बादशाहो’मध्ये अजय देवगण, इमरान हाशमी, विद्युत जामवाल, इलियाना डिक्रूज आणि ईशा गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या व्यतिरिक्त चित्रपटात सनी लिओनीचा एक आयटम नंबरही बघावयास मिळणार आहे. इमरान हाशमीनेच एका मुलाखतीत सनीच्या आयटम नंबरविषयीचा खुलासा केला होता. हा चित्रपट १ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.}}}} ">The Badass Bombshell! @Baadshahopic.twitter.com/EKb9Eauu2K— Esha Gupta (@eshagupta2811) June 17, 2017
‘बादशाहो’च्या सहाव्या पोस्टरमध्ये पहा ईशा गुप्ताचा कातिलाना अंदाज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2017 16:36 IST
मल्टीस्टारर चित्रपट ‘बादशाहो’विषयी दररोज कुठले ना कुठले पोस्टर रिलीज केले जात आहे. आज ‘बादशाहो’चे सहावे पोस्टर रिलीज करण्यात आले ...
‘बादशाहो’च्या सहाव्या पोस्टरमध्ये पहा ईशा गुप्ताचा कातिलाना अंदाज!
मल्टीस्टारर चित्रपट ‘बादशाहो’विषयी दररोज कुठले ना कुठले पोस्टर रिलीज केले जात आहे. आज ‘बादशाहो’चे सहावे पोस्टर रिलीज करण्यात आले असून, यामध्ये ईशा गुप्ता अतिशय हटके लुकमध्ये बघावयास मिळत आहे. पोस्टरवरून एक गोष्ट स्पष्ट होत आहे, ती म्हणजे चित्रपटात ईशा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत बघावयास मिळणार आहे. अक्षयकुमारच्या ‘रुस्तम’ या चित्रपटानंतर ईशा ‘बादशाहो’मध्ये बघावयास मिळेल. पोस्टरविषयी सांगायचे झाल्यास, यामध्ये ईशा खूपच कातिलाना अंदाजात दिसत आहे. ईशाने प्रिंटेंड शर्टबरोबर बेलबॉटम जीन्स घातलेली आहे. ईशाचा हा लुक बघून चाहते चित्रपटाविषयी वेगवेगळे अंदाज बांधत आहेत. मात्र जोपर्यंत ट्रेलर रिलीज होणार नाही, तोपर्यंत सर्व कलाकारांच्या भूमिकांचा अंदाज बांधणे अशक्यच म्हणावा लागेल. असो, चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासूनच चित्रपटाची कथा समोर आली आहे. कारण पहिल्यापोस्टरमध्ये मालवाहू ट्रक दिसत होता. हे पोस्टर शेअर करताना अजय देवगणने लिहिले होते की, ‘१९७५ची आणीबाणी... ९६ तास... ६०० किमी ‘बादशाहो’ लवकरच येत आहे.’