पाहा, बर्थ डे गर्ल कल्की कोच्लिनचे कधीही न पाहिलेले फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:00 IST
आपल्या दमदार अॅक्टिंगने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री कल्की कोच्लिन हिचा आज(१० जानेवारी) वाढदिवस. कल्की केवळ एक गुणी अभिनेत्रीच नाही तर एक लेखिका सुद्धा आहे. फ्रेंच वडील आणि भारतीय आई लाभलेल्या कल्कीचे आजोबा मॉरिस कोल्चिन हे आयफेल टॉवर आणि स्टॅच्यू आॅफ लिबर्टीचे चीफ इंजिनिअर होते.
पाहा, बर्थ डे गर्ल कल्की कोच्लिनचे कधीही न पाहिलेले फोटो!
आपल्या दमदार अॅक्टिंगने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री कल्की कोच्लिन हिचा आज(१० जानेवारी) वाढदिवस. कल्की केवळ एक गुणी अभिनेत्रीच नाही तर एक लेखिका सुद्धा आहे. फ्रेंच वडील आणि भारतीय आई लाभलेल्या कल्कीचे आजोबा मॉरिस कोल्चिन हे आयफेल टॉवर आणि स्टॅच्यू आॅफ लिबर्टीचे चीफ इंजिनिअर होते. ‘देव डी’साठी कल्किला बेस्ट सपोर्टींग अॅक्ट्रेसचा फिल्मफेअर अवार्ड मिळाला. यानंतर ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’,‘ये जवानी है दीवानी’,‘माय फ्रेंड पिंटो’,‘शैतान’,‘शंघाई’,‘एक थी डायन’ अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. ३० एप्रिल २०११ रोजी ती ‘देव डी’चे दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत याच्यासोबत लग्नबंधनात अडकली. ‘देव डी’च्या शूटींगदरम्यान कल्की व अनुराग जवळ आलेत. अर्थात हे नाते फार काळ टिकू शकले नाही. दोन वर्षांत दोघेही परस्परांपासून वेगळे झालेत. हे अनुरागचे दुसरे तर कल्कीचे पहिले लग्न होते. १३ नोव्हेंबर २०१३ रोजी या दोघांनी एक निवेदन जारी करून विभक्त झाल्याची घोषणा केली होती. आम्ही दोघांनीही एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतलायं. अर्थात आम्ही घटस्फोट घेतलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते. कल्की अतिशय खुल्या विचारांची आहे. अलीकडे एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत कल्कीने तिच्या सेक्स लाईफबद्दल खुलासा केला होता. तिशीनंतर सेक्स लाईफ शानदार राहिली. मी माझ्या शरिराबद्दल फार कमी वेळा संकोच करते. मी आता बेडवर अधिकच स्वार्थी झालेय, असे तिने या मुलाखतीत म्हटले होते.