Join us
Daily Top 2Weekly Top 5

​पाहा : नील नितीन मुकेश आणि रूक्मिणी सहाय यांचा प्री-वेडिंग पार्टीतील अंदाज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2017 12:29 IST

अभिनेता नील नितीन मुकेश याच्या लग्नाला आता काही तास उरले आहेत. कालपासून नीलच्या लग्नविधींना सुरुवात झाली. यानंतर रात्री रंगली ती प्री-वेडिंग पार्टी.

अभिनेता नील नितीन मुकेश याच्या लग्नाला आता काही तास उरले आहेत. उद्या ९ फेबु्रवारीला नील नितीन मुकेश लग्नबंधनात अडकणार आहे. उदयपूर येथे एका शाही सोहळ्यात नील आणि रूक्मिणी सहाय विवाह बंधनात अडकतील. या लग्नासाठी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज उदयपुरात दाखल झाले आहेत.कालपासून नीलच्या लग्नविधींना सुरुवात झाली. यानंतर रात्री रंगली ती प्री-वेडिंग पार्टी.  यात नील व रूक्मिणीच्या कुटुंबीयांसह अनेक मित्रमंडळी सहभागी झालेत.यावेळी नील थ्री पीस सूटमध्ये दिसला तर रूक्मिणी पांढºया व सोनेरी रंगाच्या पार्टी गाऊनमध्ये दिसली. या पार्टीतील संपूर्ण वातावरण गुलाबी प्रकाशात न्हाले होते.नील व रूक्मिणी दोघांनीही एकमेकांच्या हातात हात घालून पार्टीत एन्ट्री घेतली. यावेळी रूक्मिणी सासºयांच्या अर्थात नितीन मुकेश यांना वाकून नमस्कार करताना दिसली. नील यानेही रूक्मिणीच्या वडिलांचा आशीर्वाद घेतला. या पार्टीचे काही फोटो आणि व्हिडिओ स्वत: नीलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. नील व रूक्मिणी यांचे हे अरेंज मॅरेज आहे. रूक्मिणी ही नीलच्या आई आणि वडिलाच्या पसंती आहे.गतवर्षी आक्टोबरमध्ये दसºयाच्या मुहूर्तावर नील आणि रूक्मिणी यांसाखरपुडा झाला होता. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा साखरपुडा पार पडला होता. पण उदयपुरात उद्या रंगणारा नील व रूक्मिणीचा विवाह सोहळा मात्र ग्रँड होणार आहे. नील हा प्रसिद्ध गायक मुकेश यांचा नातू आहे. नील अखेरचा ‘वजीर’ या सिनेमात दिसला होता. याशिवाय ‘प्रेम रतन धन पायो’,‘आ देखें जरा’,‘शॉर्टकट रोमियो’,‘प्लेअर्स’,‘जॉनी गद्दार’ यासारख्या चित्रपटात अभिनय करून चुकला आहे.