Join us

Lokmat Most Stylish Awards 2019: क्रिती सॅनॉन ठरली 'एन्टरटेनर ऑफ द इअर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 22:25 IST

वर्षभरात उत्तमोत्तम चित्रपट देणाऱ्या क्रिती सॅनॉनचा लोकमतकडून सन्मान

तेलुगू चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेणारी आणि नंतर बॉलिवूड सिनेमांमध्ये छोटेखानी, पण लक्षवेधी भूमिका साकारून आज स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री क्रिती सॅनॉनला यंदाच्या 'लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड' सोहळ्यात 'एन्टरटेनर ऑफ द इअर' पुरस्काराने गौरवण्यात आलं.

२०१९ हे वर्षं क्रितीसाठी खरोखरच स्पेशल ठरलं, असं म्हणावं लागेल. 'लुका छुपी'मधील खट्याळ-खोडकर रश्मी त्रिवेदीची आणि 'हाऊसफुल्ल 4' मध्ये राजकुमारी मधूची धम्माल भूमिका करणाऱ्या क्रितीनं बहुचर्चित 'पानिपत'मध्ये 'पार्वतीबाई' ही अत्यंत महत्त्वाची ऐतिहासिक व्यक्तिरेखाही तितक्याच ताकदीनं साकारली. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'पती पत्नी और वो'मध्येही तिचा स्पेशल अपियरन्स आहे. वर्षभरात एकूण सहा सिनेमांमध्ये ती झळकली. तिनं आपल्या रूपानं आणि अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकली. या एन्टरटेन्मेंटबद्दलच तिचा 'एन्टरटेनर ऑफ द इअर' पुरस्कारानं सन्मान करण्यात आला.

टॅग्स :लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसक्रिती सनॉन