LMOTY 2026: अथांग समुद्राच्या लाटांती गाज आणि गेट वे ऑफ इंडियाच्या साक्षीने काल मंगळवारी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' पुरस्कार सोहळा राज्यभरातील विविध मान्यवरांच्या वरांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात पार पडला. विविध राजकीय, कला तसेच शिक्षण, समाजकारण या क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीने हा सोहळा अविस्मरणीय झाला. दरम्यान, या सोहळ्याला प्रसिद्ध गायक शान याने देखील हजेरी लावली होती. यावेळी शानने आपल्या सुरेल गायनाने उपस्थितांची मनं जिंकली.
या लोकप्रिय पार्श्वगायकाने ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर ’चा पुरस्कार सोहळा २०२६ आपल्या उपस्थितीने संस्मरणीय करून सोडला. या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तर लोकप्रिय अभिनेता विकी कौशलचाही विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी मंचावर शान देखील होता. इंडी पॉप ते बॉलिवूडमध्ये एकाहून एक सुपरहिट गाण्यांना आपला आवाज देणारा शान आजही श्रोत्यांच्या मनावर राज्य करत आहे. अशातच सध्या शानने केलेल्या एका कृतीमुळे तो चर्चेत आला आहे.
यावेळी मंचावर अशोक सराफ यांच्या गंमत जंमत या चित्रपटातील 'अश्विनी ये ना...' हे लोकप्रिय गाणे सादर करीत त्याने पुरस्कार सोहळ्यातील उपस्थित मान्यवरांना हर्षोल्हसित केलं. ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर ’ पुरस्कार सोहळ्यात प्रसंगी मंचावर शानने मराठमोळे गाणे गाऊन आपल्या सुरांनी चार चॉंद लावले.
शान हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय गायक आहे. गेली काही दशके बॉलिवूडमध्ये पार्श्वगायक म्हणून नावलौकिक कमावलेल्या, पार्श्वगायनाच्या जोरावरच आपली ओळख निर्माण करणाऱ्या या गायकाचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. द वॉइस ऑफ इंडिया आणि सारेगमप लिटिल चॅम्प्स सारख्या रिएलिटी सिंगिग शोचं त्याने परिक्षणही केलं आहे.
Web Summary : At Lokmat Maharashtrian of the Year 2026, singer Shaan captivated the audience. Veteran actor Ashok Saraf received a lifetime achievement award, and actor Vicky Kaushal was also honored. Shaan sang 'Ashwini Ye Na' from Ashok Saraf's film.
Web Summary : लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2026 में, गायक शान ने दर्शकों को मंत्रमुग्ध कर दिया। दिग्गज अभिनेता अशोक सराफ को लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार मिला, और अभिनेता विक्की कौशल को भी सम्मानित किया गया। शान ने अशोक सराफ की फिल्म का गाना 'अश्विनी ये ना' गाया।