Join us
Daily Top 2Weekly Top 5

...आपल्या चिमुकल्याला जीवापाड जपतेय लीजा हेडन!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2017 21:17 IST

​बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्रींपैकी एक असलेली लीजा हेडन सध्या आई होण्याचे सुख अनुभवत आहे. याचवर्षी एका गोंडस मुलाला जन्म देणाºया लीजाने आपल्या चिमुकल्याचे नाव जॅक ललवानी असे ठेवले आहे.

बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्रींपैकी एक असलेली लीजा हेडन सध्या आई होण्याचे सुख अनुभवत आहे. याचवर्षी एका गोंडस मुलाला जन्म देणाºया लीजाने आपल्या चिमुकल्याचे नाव जॅक ललवानी असे ठेवले आहे. मुलाची जन्माची घोषणा लीजाने इन्स्टाग्राम अकाउंटवरून केली होती. जॅकच्या जन्मानंतर लीजाने त्याचे बरेचसे फोटोज् सोशल मीडियावर शेअर केले होते. नुकताच लीजाने जॅकसोबतचा एक फोटो इन्स्टावर शेअर केला असून, त्यामध्ये ती आपल्या चिमुकल्याला कडेवर घेऊन जाताना दिसत आहे. फोटोमध्ये एक आई आपल्या बाळाची काळजी कशी घेते? हे स्पष्टपणे दिसून येत आहे. या फोटोला कॅप्शन देताना लीजाने लिहिले की, ‘तुझी आई होण्याच्या सुखापेक्षा दुसरे सुख असूच शकत नाही.’ लीजाने गेल्यावर्षीच बायफ्रेंड डिनो ललवानी याच्यासोबत लग्न केले होते. प्रेग्नेंसीदरम्यान लीजा सातत्याने फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहात होती. थोडक्यात असे म्हणता येईल की, करिना कपूर-खाननंतर लीजा एकमेव अशी अभिनेत्री आहे, जिने प्रेग्नेंसीदरम्यानचे सर्वाधिक फोटोज शेअर केले.  दरम्यान, जॅकच्या जन्मानंतरही तिने जॅकचे बरेचसे फोटोज् शेअर केले आहेत. फोटोमध्ये जॅकचा चेहरा दिसत नसला तरी, त्याचे चिमुकले हात व पाय स्पष्टपणे दिसत आहेत. मात्र तिच्या चाहत्यांना जॅकचा स्पष्ट चेहरा दिसेल असा फोटो बघण्याची आतुरता लागली आहे. सध्या लीजा विदेशात असून, आपल्या चिमुकल्याला सर्वाधिक वेळ देत आहे.