LIVE UPDATE: अलविदा ‘चांदनी’! श्रीदेवींच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची गर्दी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 11:31 IST
अभिनेत्री श्रीदेवी यांचे पार्थिव काहीच क्षणांपूर्वी सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये चाहत्यांच्या अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. आज सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत चाहत्यांना श्रीदेवींचे अंतिम दर्शन घेता येणार आहे.
LIVE UPDATE: अलविदा ‘चांदनी’! श्रीदेवींच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची गर्दी!!
अभिनेत्री श्रीदेवी यांचे पार्थिव काहीच क्षणांपूर्वी सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये चाहत्यांच्या अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. आज सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत चाहत्यांना श्रीदेवींचे अंतिम दर्शन घेता येणार आहे. तूर्तास त्यांच्या अंतिम दर्शनासाठी क्लबचे व्हिआयपी गेट खोलण्यात आले आहे. कुटुंबातील जवळचे लोक आणि मित्र या गेटने श्रीदेवींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊ शकतील. सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्य बाहेर चाहत्यांची प्रचंड गर्दी जमली आहे.आपल्या लाडक्या अभिनेत्रीला शेवटचे एकदा डोळे भरून पाहाता यावे म्हणून, चाहते अधीर आहेत. अनेक चाहते काल रात्रीपासून क्लबबाहेर प्रतीक्षा करत आहेत. सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. दुबईतील सगळा तपास पूर्ण झाल्यानंतर काल रात्री उशीरा त्यांचे पार्थिव मुंबईत आणण्यात आले. यानंतर विमानतळावरून ते थेट त्यांच्या लोखंडवालास्थित ग्रीन एकर्स येथे आणले गेले. आज सकाळी ९ वाजून ९ मिनिटाला श्रीदेवींचे पार्थिव जवळच्याच सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये आणण्यात आले. श्रीदेवींच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांनी गर्दी केली आहे. सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबबाहेर चाहत्यांच्या अशा रांगा लावल्या आहेत. दुपारी अंत्ययात्राश्रीदेवीचे पार्थिव अंधेरीच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील सेलिब्रेशन क्लबमध्ये सकाळी ९.३० पासून ११.३० पर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. दुपारी २ वाजता तेथून अंत्ययात्रा निघेल. पवनहंसजवळील विलेपार्ले स्मशानभूमीत श्रीदेवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. ALSO READ : दुबईहून मुंबईत आणले श्रीदेवी यांचे पार्थिव; आज होणार अंत्यसंस्कार!सेलिब्रिटींची हजेरीकाल रात्री श्रीदेवींचे पार्थिव त्यांच्या लोखंडवालास्थित घरी येताच अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. कलाकारांसोबत असंख्य चाहतेही गेले दोन दिवस त्यांच्या घराबाहेर गर्दी करून आहेत.