Join us

‘सुल्तान’ मध्ये सुझी बनली ‘छोटी अनुष्का’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 08:41 IST

अनुष्का शर्मा जरी सध्या ‘ऐ दिल है मुश्किल’ ची शूटिंग करत असली तरीही तिचे सुल्तान साठीचे प्रमोशन अद्याप काही ...

अनुष्का शर्मा जरी सध्या ‘ऐ दिल है मुश्किल’ ची शूटिंग करत असली तरीही तिचे सुल्तान साठीचे प्रमोशन अद्याप काही संपलेले नाही. चित्रपटाचे पोस्टर आऊट झाल्यानंतर आता हळूहळू  सेटवरील प्रत्येक गोष्ट बाहेर पडू लागली आहे.आता म्हणे, चित्रपटात छोटी अनुष्काची भूमिका सुझान खान नावाच्या एका चिमुरडीने केली आहे. त्याविषयी अधिक माहिती अशी की, सुझान आणि तिची आई भूमिकेसाठी निवड होण्याअगोदर सातत्याने ‘सुल्तान’ च्या सेटला भेट देत होत्या. तेव्हा सलमानलाच वाटले की, अनुष्का आणि सुझीमध्ये बरेच साम्य दिसत आहे.नंतर त्याने दिग्दर्शक अली अब्बास जफर याच्यासोबत चर्चा केली. अलीने देखील संमती दिली. आणि छोट्या अनुष्काच्या भूमिकेसाठी घेण्यात आलेल्या मुलीच्या जागेवर सुझीला घेण्यात आले. ‘बजरंगी भाईजान’ पाहताना सुझी प्रचंड रडली होती.आणि आता ती त्याच्यासोबतच चित्रपटात काम करताना दिसते आहे. आदित्य चोप्रा निर्मित ‘सुल्तान’ चित्रपट ईदला रिलीज होणार आहे.