Join us

​हा गायक सांगतोय अफवांवर विश्वास ठेवू नका मी जिवंत आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 13:03 IST

एखाद्या कलाकाराचे निधन झाले असल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियामुळे वाऱ्यासारख्या पसरतात. लोकदेखील त्या बातमीची शहानिशा न करता ती बातमी ...

एखाद्या कलाकाराचे निधन झाले असल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियामुळे वाऱ्यासारख्या पसरतात. लोकदेखील त्या बातमीची शहानिशा न करता ती बातमी सोशल मीडियावर फॉरवड करतात. त्यामुळे खरंच त्या कलाकाराचे निधन झाले असल्याचे लोकांना देखील वाटते. त्या कलाकाराच्या आत्मासाठी लोक सोशल मीडियावर प्रार्थना देखील करू लागतात. पण या सगळ्याचा त्या कलाकाराला आणि त्याच्या कुटुंबियांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. असाच मनस्ताप सध्या एका गायकाला सहन करावा लागला. त्याच्या निधनाची अफवा पसरल्यामुळे मी जिवंत आहे असे त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगावे लागले.प्यार तो होना ही था या गाण्याचे टायटल साँग रेमो फर्नांडिसने गायले होते. या गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या गाण्यासाठी त्याचे खूप कौतुक देखील करण्यात आले होते. त्याने एक व्हिलन, बॉम्बे व्हेलव्हेट सारख्या चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. त्याने हिंदीप्रमाणेच इंग्रजी, फ्रेंच, पोतुर्गीज आणि कोंकणी या भाषेत देखील गाणी गायली आहेत. रेमोचा या आठवड्यातील सोमवार खूपच वाईट गेला. कारण तो जिवंत असल्याचे त्यांना लोकांना पटवून देता देता त्याच्या नाकी नऊ आले होते. रेमो सध्या गोव्यात राहात आहेत. त्याच्या सोशल मीडियावर त्याच्या फॅन्सकडून त्याच्या आत्म्याला शांती लाभो असे मेसेजेस त्याला वाचायला मिळत होते. रेमो फर्नांडिसचे निधन झाले असल्याची बातमी आगीसारखी पसरली होती. त्यामुळे रेमोलाचा सोशल मीडियाच्या माध्यमातून या सगळ्या अफवा असल्याचे लोकांना सांगायला लागले. त्याने सोशल मीडियामध्ये पोस्ट केले की, मी जिवंत असून पोर्टोमध्ये मजेत आहे.रविवारी सकाळपासून रेमोचा मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर फिरत होती. रेमोचे शनिवारी रात्री निधन झाले असल्याचे अनेक व्हॉट्स अॅप ग्रुपवरून फिरत होते. अनेकांनी तर त्याची प्रसिद्ध गाणी देखील सोशल मीडियावर पोस्ट केली होती. सोमवार सकाळपर्यंत तर गोव्यामध्ये सगळीकडेच ही चर्चा होती. गोव्यातील संगीत क्षेत्रातील लोकांना तर रेमोच्या अचानक जाण्याने चांगलाच धक्का बसला होता. Also Read : या’ गायकाने म्हटले ‘हम्मा हम्मा’ गाण्याला फालतू