Join us
Daily Top 2Weekly Top 5

ही बॉलिवूड अभिनेत्री दुस-यांदा होणार आई, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 12:21 IST

‘लवकरच चौघे जण पार्टी करताना दिसतील,’ असे कॅप्शन देत तिने प्रेग्नंसीची न्यूज शेअर केली . यानंतर बॉलिवूडच्या अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सोनम कपूर, एमी जॅक्सन, पूजा हेगडे, गौहर खान अशा अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्यात.

ठळक मुद्देलीसाचा पती डिनो हा पाकिस्तानी वंशाचा ब्रिटिश एंटरप्रेन्योर गुल्लू ललवानी यांचा मुलगा आहे.

बॉलिवूड स्टार व मॉडेल लीसा हेडन दुस-यांदा आई होणार आहे. होय, लीसाने एक फोटो शेअर करत खुद्द ही गुड न्यूज चाहत्यांशी शेअर केली. या फोटोत लीसा तिचा पती डिनो ललवानी आणि मुलगा जॅकसोबत दिसते आहे. या फोटोत तिचा बेबी बम्प स्पष्ट दिसतोय.   क्वीन आणि  शौकीन  सारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी  लीसा  2016 मध्ये बॉयफ्रेन्ड डिनो लालवानीसोबत लग्नबंधनात अडकली होती. लग्नानंतर सात महिन्यांनी म्हणजे १७ मे २०१७ रोजी लीसा ने मुलाला जन्म दिला होता. मुलासोबतचे अनेक फोटो लीसा सोशल मीडियावर शेअर करत असते.

आता लीसा  दुस-यांदा आई होणार आहे. ‘लवकरच चौघे जण पार्टी करताना दिसतील,’ असे कॅप्शन देत लीसाने प्रेग्नंसीची न्यूज शेअर केली आहे.  यानंतर बॉलिवूडच्या अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सोनम कपूर, एमी जॅक्सन, पूजा हेगडे, गौहर खान अशा अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्यात.

लीसाच्या पहिल्या प्रेग्नंसीचा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. प्रेग्नंसीकाळात तिने केलेल्या बोल्ड फोटोशूटचीही प्रचंड चर्चा झाली होती. लीसा ने 2010 मध्ये ‘आयशा’ या चित्रपटातून आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात सोनम कपूर लीड रोलमध्ये होती.

लीसाचा पती डिनो हा पाकिस्तानी वंशाचा ब्रिटिश एंटरप्रेन्योर गुल्लू ललवानी यांचा मुलगा आहे. लीसा  अखेरीस ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात बघावयास मिळाली होती. लीसा ने  आयशा, रास्कल, क्वीन, द शौकिन्स, संता बंता प्रायवेट लिमिटेड, हाउसफुल- ३  आदी चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.  

टॅग्स :लीसा हेडन