Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता बाथटबमध्ये बेबी बंप दाखविताना दिसली लीजा हेडन!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2017 14:24 IST

अभिनेत्री लीजा हेडन प्रेग्नेंट असून, ती सोशल मीडियावर बेबी बंप दाखविणारे फोटोज् सातत्याने शेअर करीत आहे. यावेळेस तिने बाथटबमध्ये ...

अभिनेत्री लीजा हेडन प्रेग्नेंट असून, ती सोशल मीडियावर बेबी बंप दाखविणारे फोटोज् सातत्याने शेअर करीत आहे. यावेळेस तिने बाथटबमध्ये बेबी बंप दाखवितानाचा फोटो शेअर केला आहे. लीजा बाथटबमध्ये मॅग्झीन वाचत असतानाचा हा फोटो आहे. फोटोमध्ये लीजाचा चेहरा दिसत नसला तरी, बेबी बंप ती प्लान्ट करताना दिसत आहे. तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून लीजा प्रेग्नेंट आहे. ती प्रेग्नेंट असल्याची बातमी लीजानेच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. त्यानंतर तिने बेबी बंप दाखविणारे फोटोज् शेअर करण्याचा जणू काही धडाकाच लावला आहे. कधी मित्रांसोबत, तर कधी पती डिनो याच्यासोबत बेबी बंप दाखविणारे फोटोज् ती इन्स्टाग्रामवर शेअर करीत असते. लीजाने सहा महिन्यांपूर्वीच म्हणजेच २९ आॅक्टोबर २०१६ मध्ये पती डिनो याच्यासोबत विवाह केला होता. दीड वर्ष डेटिंग केल्यानंतर हे दोघेही विवाहबंधनात अडकले. थायलॅण्ड, फुकेट स्थित अमनपुरी बीच रिसॉर्टमध्ये अतिशय शाही पद्धतीने या दोघांनी विवाह केला होता. या विवाहाचे फोटोज्देखील लीजाने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. लीजाचा पती डिनो हा पाकिस्तानी वंशाचा ब्रिटिश एंटरप्रेन्योर गुल्लू ललवानी यांचा मुलगा आहे. लीजा अखेरीस ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात बघावयास मिळाली होती. लीजाने ‘आयशा, रास्कल, क्वीन, द शौकिन्स, संता बंता प्रायवेट लिमिटेड, हाउसफुल- ३’ आदि चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. दरम्यान, लीजाचे हे बेबी बंप दाखविणारे फोटोज् तिच्या फॅन्ससाठी पर्वणीच ठरत आहे. कारण आतापर्यंत तिने शेअर केलेल्या सर्व फोटोज्ना तिच्या फॅन्सनी तुफान लाइक्स केले आहे. बाथटबमध्ये शेअर केलेल्या या फोटोलादेखील तिच्या फॅन्सकडून पसंती मिळत आहे.