Join us
Daily Top 2Weekly Top 5

​लीजा हेडन दिसतेय तितकीच हॉट, तितकीच सेक्सी! प्रसूतीनंतर मुलासोबत केले पहिले फोटोशूट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 14:02 IST

बॉलिवूड अभिनेत्री लीजा हेडन तूर्तास मुलगा जॅकच्या संगोपनात बिझी आहे. जॅकसोबतचे अनेक फोटो लीजा वेळोवेळी शेअर करत असते. पण आता लिजाने जॅकसोबतच्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री लीजा हेडन तूर्तास मुलगा जॅकच्या संगोपनात बिझी आहे. जॅकसोबतचे अनेक फोटो लीजा वेळोवेळी शेअर करत असते. पण आता लिजाने जॅकसोबतच्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  या  ग्लॅमरस मॉमसोबत पाच महिन्याच्या चिमुकल्या जॅकचे फोटो अगदी दृष्ट लागावी, इतके सुंदर आहेत. अर्थात या फोटोंमध्ये कुठेही जॅकचा पूर्ण चेहरा दिसत नाहीय.मे २०१७ मध्ये लीजाने जॅकला जन्म दिला. डिलिवरीनंतरचे हे लीजाचे हे पहिले फोटोशूट आहे. पण यातील लीजाचे फिगर पाहून यावर विश्वास ठेवणे कठीण वाटतेय.सर्वच फोटोंमध्ये लीजा आधीइतकीच स्लिम, हॉट आणि सेक्सी दिसतेय. ‘हार्पर बाजार’साठी लीजाने केलेल्या या फोटोशूटचा एक ‘बिहाइंड द सीन’ व्हिडिओही समोर आला आहे. यातील लीजाचा अंदाज बघण्यासारखा आहे. ALSO READ: SEE : ​लीजा हेडनने असा साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस! पाहा, सेलिब्रेशनचे काही खास फोटो!!‘क्वीन’ आणि ‘शौकीन’ सारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणा-या लीजाने गतवर्षी सप्टेंबरमध्ये साखरपुड्याची घोषणा केली होती. यानंतर गतवर्षी २९ आॅक्टोबरला ती बॉयफ्रेन्ड डिनो लालवानीसोबत लग्नबंधनात अडकली होती. लग्नानंतर सात महिन्यांनी म्हणजे १७ मे २०१७ रोजी लीजाने मुलाला जन्म दिला होता. जॅक आता पाच महिन्यांचा झाला आहे. अद्याप जॅकचा चेहरा चाहत्यांनी पाहिलेला नाही. पण त्याची झलक मात्र अनेकदा पाहिली आहे.नुकताच लीजा व डिनोने अंदमान बेटावरच्या लँगकावी येथे आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचे काही फोटोही लीजा व डिनोने सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोमध्ये लीजा व डिनो अनेक रोमॅन्टिक पोज देताना दिसले होते. लीजाचा पती डिनो हा पाकिस्तानी वंशाचा ब्रिटिश एंटरप्रेन्योर गुल्लू ललवानी यांचा मुलगा आहे. लीजा अखेरीस ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात बघावयास मिळाली होती. लीजाने  आयशा, रास्कल, क्वीन, द शौकिन्स, संता बंता प्रायवेट लिमिटेड, हाउसफुल- ३  आदी चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.    तूर्तास लीजा बाळाच्या संगोपणात व्यक्त आहे आणि मातृत्व मस्तपैकी एन्जॉय करतेय.