Join us

Lipstick under my burkha : शाहरूख खान म्हणाला, यूपी निवडणुकीविषयी विचारा... मात्र ‘हे’ विचारू नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2017 16:41 IST

अलंकृता श्रीवास्तव दिग्दर्शित ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या सिनेमावर सेन्सॉर बोर्डाने बॅन लावल्यानंतर संपूर्ण बॉलिवूड एकजूट होऊन सेन्सॉर बोर्डाचा ...

अलंकृता श्रीवास्तव दिग्दर्शित ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या सिनेमावर सेन्सॉर बोर्डाने बॅन लावल्यानंतर संपूर्ण बॉलिवूड एकजूट होऊन सेन्सॉर बोर्डाचा निषेध नोंदवित आहे. मात्र या सर्व घडामोडींपासून बॉलिवूडचा किंग शाहरूख खान मात्र पूर्णत: अनभिज्ञ आहे. जेव्हा त्याला याविषयी विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, ‘मला तुम्ही उत्तर प्रदेशातील निवडणुकांविषयी विचारा मात्र याविषयी विचारू नका, कारण मला यातले काहीच माहीत नाही, मी तर सुट्टीवर होतो’. शाहरूखने दिलेले हे उत्तर खरोखरच पटण्यासारखे आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. सेक्स सीन्सचा भडीमार अन् अश्लील शब्दप्रयोग असल्याचे कारण देत सेन्सॉर बोर्डाने ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या सिनेमाला ग्रीन सिग्नल देण्यास नकार दिला होता. त्यानंतर संपूर्ण बॉलिवूड एकजूट होऊन सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात उभे राहिले. फरहान अख्तर, कबीर खान, नीजर घायवान, सुधीर मिश्रा, रेणुका शहाणे आदि कलाकारांनी तर उघडपणे सेन्सॉर बोर्डाचा निषेध केला. त्यामुळे बॉलिवूडच्या बड्या कलाकारांचे याविषयी काय मत आहे, हे जेव्हा जाणून घेण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्यांना हे प्रकरणच माहीत नसल्याचे समोर आले. प्रकाश झा यांच्या प्रॉडक्शन अंतर्गत बनविलेल्या या चित्रपटाचे स्क्रिनिंग अनेक आंतरराष्टÑीय चित्रपट महोत्सवांमध्ये करण्यात आले आहे. बºयाचशा ठिकाणी या चित्रपटाचे तोंडभरून कौतुक करण्यात आले. टोकियो आंतरराष्टÑीय चित्रपट महोत्सवात तर या चित्रपटाला ‘स्पिरिट आॅफ एशिया’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. मात्र जेव्हा सेन्सॉर बोर्डाकडे हा चित्रपट गेला तेव्हा त्यांनी ‘महिला केंद्रित’ चित्रपट असल्याचा निर्वाळा देत सर्टिफिकेट देण्यास सपशेल नकार दिला. त्यानंतर मात्र संपूर्ण बॉलिवूड सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात एकजूट झाले.  अशात शाहरूख मात्र वेगळ्याच सुरात बघावयास मिळाला. त्याने सेन्सॉर बोर्डाविषयी एक शब्दही न बोलता याप्रकरणावर चुप्पी साधली. त्याचबरोबर उत्तर प्रदेश निवडणुकीविषयी विचारा मात्र सेन्सॉर बोर्डाविषयी विचारू नका, असे म्हटल्याने एकप्रकारे आगीत तेल ओतण्यासारखेच वक्तव्य केले आहे. आता यावर बॉलिवूडमध्ये कशाप्रकारच्या प्रतिक्रिया समोर येतात, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. या चित्रपटात कोंकणा सेन-शर्मा, रत्ना पाठक शाह, विक्रांत मॅसी, अहाना कुमरा, प्लाबिता बोरठाकूर आणि शशांक अरोडा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.