Join us
Daily Top 2Weekly Top 5

लुलियाची ईद पार्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 16:45 IST

सलमानची गर्लफ्रेंड आणि रोमानियाची टेलिव्हिजन स्टार लुलिया वांतूरने आपल्या मित्रांसमवेत ईदची पार्टी साजरी केली. यावेळी सलमानची बहीण अर्पिता खान ...

सलमानची गर्लफ्रेंड आणि रोमानियाची टेलिव्हिजन स्टार लुलिया वांतूरने आपल्या मित्रांसमवेत ईदची पार्टी साजरी केली. यावेळी सलमानची बहीण अर्पिता खान शर्मा, अभिनेत्री इली अवराम आणि अभिनेता पुलकित सम्राटची भावी वधू श्वेता रोहिरा यावेळी उपस्थित होत्या. इलीने यावेळी लहेंगा चोली परिधान केली होती. श्वेताने एम्ब्रॉयडेड सलवार कमीज घातला होता.अर्पिताने श्वेता आणि इलीसोबत फोटो शेअर केले.मंगळवारी लुलिया सलमान खान सोबत ‘सुलतान’च्या स्क्रीनिंगला उपस्थित होती.प्रिती झिंटाच्या लग्न सोहळ्यात सलमान आणि लुलिया एकत्र आले होते. त्यापूर्वी सलमानच्या कुटुंबियासमवेत लुलियाला पाहण्यात आले होते.